घरमनोरंजननोराचा हॉट डान्स परफॉर्मन्स,‘हाय गर्मी’वर नोरा फतेहीने धरला लावणीवर ठेका.

नोराचा हॉट डान्स परफॉर्मन्स,‘हाय गर्मी’वर नोरा फतेहीने धरला लावणीवर ठेका.

Subscribe

रियलिटी शो,हिंदी मालिका,अनेक तामिळ चित्रपटात नोराने काम केलं आहे. नोरा लवकरच अजय देवगणच्या ‘भुजः द प्राइड इंडिया’ या आगामी सिनेमात झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या हॉट आणि ग्लॅमरस अंदाजाचे अनेक चाहते आहेत.दमदार डान्सने तर नोरा अनेकांना घायाळ करते. डान्स दिवानेच्या सेटवर नोरा फतेहीने मराठमोळ्या लावणी नृत्यावर ठेका धरला आहे. तिचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. डान्स शोमधील स्पर्धक सूचनाने जबरदस्त लावणी परफॉमंर्स सादर केला होता. यानंतर नोरा स्वत: ला लावणीवर डान्स करायला रोखू शकली नाही. नोरा फतेहीने सूचना सोबत लावणीचा ठेका धरला. नोरने ‘हाय गर्मी’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. नोराच्या या डान्स परफॉमंर्सवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. सध्या नोराचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान गाजत आहे. चाहत्यांच्या नोराच्या ठसकेबाज लावणीवर अक्षरशःलाईक्स आणि कामेट्सचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास नोराने मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड मध्ये आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. रियलिटी शो,हिंदी मालिका,अनेक तामिळ चित्रपटात नोराने काम केलं आहे. नोरा लवकरच अजय देवगणच्या ‘भुजः द प्राइड इंडिया’ या आगामी सिनेमात झळकणार आहे.


हे हि वाचा – बॉलिवूड अभिनेता हरीश पटेल दिसणार ‘मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सच्या’ चित्रपटात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -