घरमनोरंजनबॉलिवूड अभिनेता हरीश पटेल दिसणार 'मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सच्या' चित्रपटात

बॉलिवूड अभिनेता हरीश पटेल दिसणार ‘मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सच्या’ चित्रपटात

Subscribe

अभिनेता हरीश पटेल यांनी याआधी देखील अनेक हॉलिवूड चित्रपटात काम केल आहे. ‘रन फैटबॉय रन’, ‘ऑल इन गुड टाइम’, ‘टुडेज़ स्पेशल’, ‘मिस्टर स्टिंक’ यामध्ये त्यांची वर्णी लागली होती.

मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सने संपूर्ण जगाला अनेक अविश्वसनीय सुपर हीरोची ओळख करून दिली. जगभरामध्ये मार्वल यूनिवर्सचे असंख्य चाहते आहेत. तसेच प्रेक्षक मार्वल यूनिवर्सच्या  पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतच मार्वल यूनिवर्स अंतर्गत येणार्‍या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे आणि एक व्हिडिओ रिलीज करण्यात आलाआहे. व्हिडिओ मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शांनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.  चित्रपटांच्या घोषनेदरम्यान प्रसिद्ध आगामी ‘इटर्नल्स’चित्रपटाचे काही सीन दाखवण्यात आले . यादरम्यान मार्वल यूनिवर्सच्या भारतीय चाहत्यांच्या नजरेज आलं आहे की, चित्रपटात बॉलिवूड स्टार हरीश पटेल यांची झलक पहायल मिळते. भारतीय मार्वल यूनिवर्सच्या चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. 1998 साली आलेला बॉलिवूड चित्रपट ‘गुंडा’ मध्ये हरीश पटेल यांनी ‘इबू हाटेला’ हे पात्र साकारले होते.हरीश पटेल यांनी एका मुलाखती दरम्यान याचा अधिकृत पणे खुलासा केला आहे. मुलाखतीमध्ये हरीश यांनी म्हंटले आहे की,”होय, टीझरमध्ये तुम्ही पाहिलं तो मीच आहे. ‘इटर्नेल्स’ चित्रपटात काम करत आहे. पण मी यापेक्षा जास्त काहीच सांगू शकत नाही. निर्मात्यांनी अद्याप माझ्या पात्राचे नाव जाहीर केलं नाहीये, मी सूद्धा याचीच वाट पाहत आहे.”

- Advertisement -

तसेच हफिंगटन पोस्टचे पूर्व इंटरटेनमेंट एडिटर अंकुर पाठक यांनी ट्विट करत लिहलं आहे की तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की इबू हटेला ही सुप्रसिद्ध भूमिका साकारणारा अभिनेता आता मार्व्हलच्या ‘द इंटरनेल्स’ मध्ये दिसणार आहे. आपण हे लाइनअप व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता. आपल्या स्वप्नांसमोर कधीही हार मानू नका.”अभिनेता हरीश पटेल यांनी याआधी देखील अनेक हॉलिवूड चित्रपटात काम केल आहे. ‘रन फैटबॉय रन’, ‘ऑल इन गुड टाइम’, ‘टुडेज़ स्पेशल’, ‘मिस्टर स्टिंक’ यामध्ये त्यांची वर्णी लागली होती.


हे हि वाचा – ‘किशोरदा आणि लतादीदींचं ते गाणं मी रिलीज करणार!’- हिमेश रेशमिया

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -