घरमनोरंजन'बडे अच्छे लगते है २' मध्ये नकुल मेहता आणि दिशा परमारची एन्ट्री

‘बडे अच्छे लगते है २’ मध्ये नकुल मेहता आणि दिशा परमारची एन्ट्री

Subscribe

अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक दशक लोटून गेल्यानंतरही या मालिकेचे अनेक चाहते दुसऱ्या पर्वाच्या प्रतिक्षेत आहेत. यातच ‘बडे अच्छे लगते हैं’ च्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली. तेव्हापासून या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण झळकणार याविषयी चर्चा रंगत होत्या. मात्र आता हे कोडं उलगडले आहेत.

नुकताच ‘बडे अच्छे लगते हैं २’ मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात साक्षी तन्वरच्या भूमिकेत दिशा परमार तर नकुल मेहता राम कपूरची भूमिकेत दिसतोय. मालिकेचा प्रोमो रिलीज होताच चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे ‘बडे अच्छे लगते हैं २’ मालिकेसाठी नकुल मेहता आणि दिशा परमारचे नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. नकुल आणि दिशाची जोडी ८ वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे. या दोघांनी यापूर्वी ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते. यांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

- Advertisement -

मालिकेच्या कथेत मोठे बदल

‘बडे अच्छे लगते हैं २’ मालिकेचा प्रोमो रिलीज होण्याआधीपासून एकता कपूर लाईव्ह सेशन करतेय. या सेशनदरम्यान तिने या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा उद्देश केवळ टीआरपी नसल्याचे स्पष्ट केले. ३० व्या पिढीत लोकांना एकटेपणामुळे सहन करावे लागणारे दु:ख आणि त्याभोवतीची कथा या नव्या भागात पाहायला मिळणार आहे.


‘Super Dancer 4’ मधून शिल्पा शेट्टीला कायमचा डच्चू? जॅकी श्रॉफ- संगीता बिजलानी सेलिब्रिटी पाहुणे बनून येणार


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -