घरताज्या घडामोडीKBC 13: केबीसीत नीना गुप्तासंबंधित विचारला प्रश्न; स्पर्धेकाने जिंकले साडे बारा लाख

KBC 13: केबीसीत नीना गुप्तासंबंधित विचारला प्रश्न; स्पर्धेकाने जिंकले साडे बारा लाख

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन (amitabh bachchan) सध्या क्विज रिअॅलिटी शो केबीसी (KBC – कौन बनेगा करोडपती)च्या सीझन १३च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या शोच्या माध्यमातून अनेक स्पर्धेकांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर नशीब आजमावले आहे. केबीसी १३ मधील नेहा बथला (neha bathla) हॉटसीटवर बसणारी दुसऱ्या स्पर्धक आहेत. नेहा उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील एक पशुवैद्य असून कोरोना महामारी दरम्यान एका नोडल अधिकाऱ्याच्या रुपात त्यांनी काम केले आहे. त्यांनी केबीसीमध्ये १२व्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन साडे बार लाख रुपये जिंकले आहेत. सध्या त्या नीना गुप्तासंबंधित (neena gupta) विचारलेल्या प्रश्नामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

केबीसी १३ मध्ये नेहा बथला या खूप चांगल्याप्रकारे खेळल्या. त्यांना ११वा प्रश्न बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्‍ता यांच्यासंदर्भात विचारण्यात आला. ६ लाख ४० हजारासांठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी नीना गुप्ता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे? हा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर नेहा यांनी अचूक दिले आणि त्यांनी ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जिंकली. त्यानंतर त्यांना १२वा प्रश्न विचारण्यात आला. यासाठी त्यांनी एक्सपर्टची मदत घेतली आणि १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. पण यानंतर त्या १३ व्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत.

- Advertisement -

पण साडे बारा लाख जिंकल्यानंतर त्या म्हणाल्या की, ‘हा फक्त पैसा नाही आहे तर मी माझे सासरे प्रदीप कुमार जोशी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे आले होती. माझ्या सासऱ्यांमुळे मी केबीसी १३मध्ये आले. कारण त्यांनी मला शोमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.’


हेही वाचा – Drugs Case: राकुल प्रीत सिंह, रवी तेजा,राणा दग्गुबतीवर ईडीची टांगती तलवार


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -