घरताज्या घडामोडीती पुन्हा येणार! मालिकेत आधीच्या शनायाची पुन्हा एन्ट्री!

ती पुन्हा येणार! मालिकेत आधीच्या शनायाची पुन्हा एन्ट्री!

Subscribe

इशा केसकरचा मालिकेला रामराम

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. गुरू, राधिका आणि शनाया या पात्रांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. अभिजीत खांडकेकर, रसिका धबडगावकर, अनिता दाते या त्रिकुटापैकी शनाया म्हणजेच रसिकाने काही महिन्यांपूर्वी मालिकेतून निरोप घेतला. तिच्या जागी इशा केसकरने शनायाची भूमिका साकारली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत परतणार असल्याचं समजत आहे.

- Advertisement -

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिका परदेशी गेली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. त्यानंतर शनाया हे पात्र इशा केसकरने साकारलं. सध्या शनायाची भूमिका साकारणारी इशा काही वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडत असल्याचं कळतंय. त्यामुळे तिच्या जागी पुन्हा एकदा जुनी शनाया परतणार आहे.

- Advertisement -

तीन महिन्यांनंतर मालिकेला पुन्हा सुरूवात झाली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचंही शूटिंग सुरू आहे. पण आता रसिका सुनील यात कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.


हे ही वाचा – मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीला कोरोनाची लागण, क्रू मेंबर्सचीही होणार चाचणी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -