घरमनोरंजनअभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशच्या 'मन कस्तुरी रे' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशच्या ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Subscribe

तेजस्वी आणि अभिनयने यापूर्वी सुद्धा या चित्रपटाबाबत माहिती शेअर केली होती. दरम्यान आता चित्रपटाचे पोस्टर पाहून तेजस्वीचे चाहते अधिकच आतुर झाले आहेत. तेजस्वी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठीमध्ये पदार्पण करत आहे

हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे वारंवार चर्चेत असते. दरम्यान, तेजस्वी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ते म्हणजे तिच्या आगामी मराठी चित्रपटामुळे, नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर तेजस्वीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे. या चित्रपटाचं नाव ‘मन कस्तुरी रे’ हे असून या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता अभिनय बेर्डे सुद्धा झळकणार आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी आणि अभिनयने यापूर्वी सुद्धा या चित्रपटाबाबत माहिती शेअर केली होती. दरम्यान आता चित्रपटाचे पोस्टर पाहून तेजस्वीचे चाहते अधिकच आतुर झाले आहेत. तेजस्वी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठीमध्ये पदार्पण करत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मन सांगे हे मला वेड लागे या जीवा, सावरू नको रे तू मला, नव्या स्पंदनांची नवी लव्हस्टोरी मन कस्तुरी रे, ४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

- Advertisement -

आत्तापर्यंत तेजस्वीने हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. बिग बॉस १५ मुळे तेजस्वी घराघरांत पोहोचली. शिवाय सध्या करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे देखील तेजस्वी वारंवार चर्चेत असते. सध्या तेजस्वी नागिन ६ मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून येते.

दरम्यान, अभिनय बेर्डेने सुद्धा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ती सध्या काय करते या चित्रपटामुळे अभिनयला ओळख मिळाली.


हेही वाचा : भारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -