घरमनोरंजनभारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

भारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

Subscribe

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मेरी मिलबेनला आमंत्रित करण्यात आलं आहे आणि ती भारतात येण्यासाठी तयार सुद्धा झाली आहे

सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबेन भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या अमृत महोत्सवात सहभागी होणार आहे. अशी माहिती ‘इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशन'(ICCR)ने दिलेली आहे. मेरी मिलबेनला भारतामध्ये ‘ओम जय जगदीश हरे’ आणि ‘जन गण मन’ या दोन गाण्यांमुळे ओळखले जाते. (ICCR)ने सांगितले की, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मेरी मिलबेनला आमंत्रित करण्यात आलं आहे आणि ती भारतात येण्यासाठी तयार सुद्धा झाली आहे. मेरी मिलबेन पहिली अमेरिकम कलाकार आहे, जिला ICCR कडून स्वातंत्र्य दिनानिमित्त आमंत्रित करण्यात आलं आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात भारतीय राष्ट्रगीत गाणार मेरी मिलबेन
ICCR ने सांगितले की मेरी अमेरिकेचे प्रतिनिधित्त्व करणारी अमेरिकेची प्रमुख पाहूणी असेल आणि पहिल्यांदा ती भारतामध्ये सादरीकरण करणार आहे. या सोहळ्यामध्ये मेरी मिलबेन भारताचे राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करेल. १५ ऑगस्ट रोजी होणार हा स्वातंत्र्य सोहळा दिल्लीतील लाल किल्ल्यावर साजरा केला जाईल.

- Advertisement -

मेरी मिलबेनला वाटतोय अभिमान
भारतामध्ये येण्यापूर्वी मेरी मिलबेनने एक वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय की, “१९५९ मध्ये भारताला भेट देणाऱ्या डॉ. मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मला खरंच खूप अभिमान वाटत आहे. मला भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये एक सांस्कृतिक राजदूत रूपामध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे मला खूप अभिमानास्पद वाटत आहे.”

लखनऊमध्ये सुद्धा जाणार मेरी मिलबेन
मेरी मिलबेन म्हणाली की, जेव्हा मी भारतामध्ये पहिल्यांदा येणार आहे, त्यामुळे माझ्या मनात डॉ. किंग यांचे शब्द पुन्हा सांगू इच्छिते. डॉ. किंग म्हणायचे की, “दुसऱ्या देशांमध्ये मी एक पर्यटक म्हणून जाऊ शकतो, परंतु भारतामध्ये मी एक तीर्थयात्री म्हणून जातो.” मेरी मिलबेन दिल्ली शिवाय लखनऊ येथे सुद्धा जाणार आहे.


हेही वाचा :बॉलिवूडची डेझी शहा थिरकली मराठी गाण्यावर, ‘राघू आला पिंजऱ्यात’ गाणं प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -