Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सुपरस्टार प्रभासची रवीना टंडन होती एक्स गर्लफ्रेंड?

सुपरस्टार प्रभासची रवीना टंडन होती एक्स गर्लफ्रेंड?

Subscribe

'नच बलिए ९' कार्यक्रमाच्या दरम्यान मस्ती मज्जाक करताना प्रभासने धक्कादायक खुलासा

साऊथचा सुपरस्टार प्रभासचा आगामी थ्रिलर चित्रपट साहो लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता प्रभास आणि त्याची सहकलाकार श्रद्धा कपूरने ‘नच बलिए ९’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान मस्ती मज्जाक करताना प्रभासने धक्कादायक खुलासा केला आहे. हे ऐकून कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून स्पर्धकांपेक्षा सगळ्यात जास्त रवीना टंडन थक्क झाली.


हेही वाचा- ‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका


- Advertisement -

दरम्यान, कार्यक्रमाचे परिक्षक असणाऱ्या अहमद यांनी सांगितले की, प्रभासचे एक स्वप्न आहे, इथे उपस्थित असणाऱ्या मुलीचा ते चाहता आहे. हे ऐकताच सगळे प्रभासकडे पाहू लागले. यावेळी प्रभासने रवीना टंडनकडे बघत सांगितले की, ‘मी तुमचा खूप चाहता आहे. तुम्ही तर माझी एक्स गर्लफ्रेंड आहात..’ यावर रवीना हसत म्हणाली, ‘माझ्या नवर्याने हे ऐकलं तर तो तुला जीवंत नाही सोडणार’..यावर प्रभास बोलला मी सर्व तुमच्याकरिता सांभाळून घेईल. यानंतर दोघांनी रवीना टंडनच्या सुपरहीट टिपटिप बरसा पाणी या गाण्यावर डान्स केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -