घरमनोरंजनप्रभास आणि श्रुती हसन या चित्रपटात दिसणार एकत्र

प्रभास आणि श्रुती हसन या चित्रपटात दिसणार एकत्र

Subscribe

बाहुबलीनंतर प्रभास आणखी एक धमाका करण्यास तयार झाला आहे. एका नवीन चित्रपटात प्रभासची श्रुती हसन सोबत केमिल्ट्रि पाहायला मिळणार आहे.

‘बाहुबलीस्टार’ प्रभासचा श्रद्दा कपूरसोबतच्या ‘साहो’ या चित्रपटाला म्हणावा तसा प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता त्याचे चाहते त्याला पुन्हा मोठ्यापडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मागील काही दिवसांपासून प्रभासच्या ‘सलार’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा ही देखील केली आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासचा ‘सलार’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट १४ एप्रिल,२०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा स्वत: प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केली आहे.

सलार चित्रपटाच्या प्रदर्शनेच्या घोषणेबाबत एक पोस्टदेखील प्रभासने केली आहे. ”सलारची रिलीज डेट शेअर करुन आनंद मिळाला, १४ एप्रिल,२०२२ रोजी तुम्हाला चित्रपटगृहात भेटतो.” अशा प्रकारची पोस्ट प्रभासने केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमांतून प्रभास सुपरहिट केजीएफ चित्रपटच्या निर्मात्यासोबत काम करणार आहे. तसेच चित्रपटाला संगीतही केजीएफचा गायक रवि बसरुरने दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून विजय किरगंदुर यांनी निर्मिती केली आहे. सलार व्यतिरिक्त प्रभासकडे ओमर राऊत यांचा ‘आदिपुरुष’ आणि ‘राधेश्याम’ चित्रपट देखील आहे. ‘आदिपुरुष’ हा ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर ‘राधेश्याम’ यावर्षी ३० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हे वाचा- Amitabh Bachchan Health: बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -