घरमनोरंजनचित्रपटांचा गौरवशाली इतिहास; ‘प्रभात फिल्म कंपनी’ची नव्वदी पार!

चित्रपटांचा गौरवशाली इतिहास; ‘प्रभात फिल्म कंपनी’ची नव्वदी पार!

Subscribe

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरात नोंदवलं गेलं आहे. पार्वतीबाई दामले यांनी १ जून १९२९ रोजी मंगल कलश ठेऊन या कंपनीची सुरुवात केली होती. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणार्‍या दामलेमामा, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली आणि स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी यांची दामलेमामांशी जुनी मैत्री होती आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्या काळात सितारामपंतांनी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले-फत्तेलाल यांच्यासोबत शांतारामबापू आणि धायबरही एकत्रित झाले. त्यातून ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत करण्यात आली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९० वर्षे होत आहेत.

१९२९ ते १९३२ या दरम्यान प्रभातकारांनी सहा मूकपटांची निर्मिती केली. तर १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाची निर्मिती केली. आजवर भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे. १९३४ साली प्रभातचे पुण्यातील प्रभातनगर येथे स्थलांतर झालं. दामलेमामांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्याकाळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ ची ख्याती होती.

- Advertisement -

१९३२ ते १९३४ दरम्यान ‘प्रभात’ने ६ बोलपटांची निर्मिती केली. १९३३ मध्ये ‘प्रभात’ने भारतातील पहिला रंगीत बोलपट ‘सैरंध्री’ बनवला. आजवर २०१९ सालामध्ये या ‘प्रभात’ च्या वास्तूमध्ये ‘फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट’ मोठ्या दिमाखात उभी आहे. १९३४ ते १९५७ दरम्यान २६ बोलपटांची निर्मिती झाली. १९५७ साली प्रभात बंद झाली. १९५७ ते १९५९ या कालावधीत एस. एच. केळकर यांनी प्रभात चालवली. पुढे १९६१ साली भारतीय सरकारने ही कंपनी विकत घेऊन ‘फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट’ची स्थापना झाली.

दामले कुटुंबियांतर्फे निर्मित दोन माहितीपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘इट्स प्रभात’ हा माहितीपट ‘प्रभात’च्या ७५ व्या स्थापनेच्या वर्धापन वर्षी म्हणजे २००४ साली निर्माण केला होता. तर २०१२ साली ‘विष्णुपंत दामले’ बोलपटांचा मुकनायक हा माहितीपट निर्माण केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -