घरमनोरंजनAmy Jackson सोबतच्या ब्रेकअपनंतर प्रतीक बब्बर डिप्रेशनचा शिकार; इंडस्ट्रीतून झाला गायब

Amy Jackson सोबतच्या ब्रेकअपनंतर प्रतीक बब्बर डिप्रेशनचा शिकार; इंडस्ट्रीतून झाला गायब

Subscribe

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारे सुपरस्टार राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर याने 2008 मध्ये जाने तू… या जाने ना या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर सुमारे 10 वर्षांपूर्वी त्याचा ‘एक दीवाना था हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटात प्रतीक बब्बर आणि एमी जॅक्सन मुख्य भूमिकेत होते. मात्र या चित्रपटानंतर प्रतिकला एमी जॅक्सनवर प्रेम जडले, मात्र काही काळातचं त्यांचे ब्रेकअप झाले, त्यानंतर त्याच्या आयुष्यात असे काही चढ-उतार आले ज्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला.

प्रतिक 2012 मध्ये एमीच्या प्रेमात खरोखरचं वेडा झाला होता, परंतु आयुष्यातील या सर्वात आनंदी क्षणाचे त्याने सर्वात वाईट काळ म्हणून वर्णन केले आहे. त्याने खुलासा केला की, तो एमीच्या प्रेमात पडला आणि तिथूनच त्याच्या आयुष्यातील सर्व निर्णय चुकत गेले. वयाच्या 25 व्या वर्षी त्याचे एमीसोबत ब्रेकअप झाले आणि त्यानंतर तो डिप्रेशनचा शिकार झाला. प्रेमभंगानंतरच्या दु:खामुळे प्रतिक ड्रग्सच्या आहारी गेला. यादरम्यान तो इंडस्ट्रीतून देखील दिसेनासा झाला.

- Advertisement -

नुकतंच प्रतिकने एमीसोबतच्या ब्रेकअपनंतर त्याच्या आयुष्यात काय घडले याचा खुलासा केला आहे. त्याचा आयुष्यातील बॅड पॅचबद्दल तो बोलला आहे. प्रतीक आणि एमी 2012 मध्ये एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळातचं त्यांचे ब्रेकअप झाले. दोघांची भेट ‘एक था दिवाना’च्या सेटवर झाली होती. मात्र एमीसोबतच्या ब्रेकअपमुळे प्रतीक आतून खूपचं खचून गेला. यादरम्यान तो डिप्रेशनचा बळी ठरला. यामुळे त्याच्या आयुष्यात खूप वाईट वेळ आली होती.

या घटनेवर प्रतीक म्हणाला की, ‘हा एक चांगला चित्रपट होता, पण मी एमीच्या ​​प्रेमात पडलो आणि मग सर्व काही चुकत गेले. सोप्या भाषेत कसं सांगायचं तर… मला वाटतं वाईट टप्पा तेव्हा सुरू झाला जेव्हा मला हार्टब्रेक फील झाले. वयाच्या 25 व्या वर्षी प्रेमभंग होण्याची गोष्टचं वेगळी आहे. ज्या कारणामुळे मी इंडस्ट्रीतून गायब झालो.

- Advertisement -

प्रतिक एमीबद्दल बोलताना म्हणाला की, मी एमीसोबतचे नाते कधीच गुप्त ठेवले नाही. 2012 मध्ये त्याने एमीला डेट करत असल्याची कबुली दिली. तसेच एमी ही जगातील सर्वात सुंदर मुलगी असल्याचे म्हणते ती एक ह्रदयाने एक सच्ची मुलगी होती असेही तो म्हणाला.

ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनंतर 2017 मध्ये एमीने सांगितले होते की, तिचा प्रतीकशी काहीच संपर्क झाला नाही. यावर प्रतिक म्हणाला की,एक्स मित्र असू शकतात, परंतु तिला असे वाटत नाही की, ते शक्य आहे. ब्रेकअपनंतर दोघे एकमेकांसोबत कधीच बोलले नाहीत. प्रतीकने सान्या सागरशी लग्न केले. त्याच वेळी, अॅमी आता एका मुलाची आई आहे. मुलाच्या वडिलांचे नाव जॉर्ज पनायोटोउ आहे.


The Kashmir Files चित्रपट महाराष्ट्रात करमुक्‍त करण्यासाठी विधानसभेतील 92 आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -