घरमनोरंजनPravin Tarde : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Pravin Tarde : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्याने याच चित्रपटातून दिग्दर्शनात देखील पदार्पण केलं. या चित्रपटाबद्दल अनेक कलाकार आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मराठी अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अनेकजण चित्रपटांबद्दल वेगवेगळी मतं मांडत आहेत. रणदीपसह अंकिता लोखंडे व अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
॥ धर्मो रक्षिती रक्षित:॥
अफाट अचाट आयुष्य जगलेल्या
जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या
महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं
ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा, ही पोस्ट शेअर करत प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या प्रतिक्रियेवरुन एक गोष्ट कळली की त्यांना हा चित्रपट फार आवडला आहे.

- Advertisement -

प्रवीण तरडेंच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर म्हणाला, “साक्षात सावरकर यांना भूमिकेतून जिवंत करणारे रणदीप हुडा यांना सलाम”. आणखी एक युजर म्हणाला, “या चित्रपटासंदर्भात एकाही मराठी कलाकाराची पोस्ट वाचली नव्हती.. पहिली पोस्ट कोणाची येईल याची आतुरतेने वाट पाहत होते … आणि पहिले कलाकार तुम्ही आहात की ज्यांनी त्यावर पोस्ट लिहिली .. अभिनंदन आणि धन्यवाद”

- Advertisement -

प्रवीण तरडेंच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीच्या काळामध्ये झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये ते संवादलेखनाचे काम करत होते. ‘रेगे’,‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. . 2022 मध्ये त्यांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट खूप गाजला. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -