घरमुंबईविलेपार्ले येथे विहिरीचा स्लॅब कोसळून तीघांचा मृत्यू

विलेपार्ले येथे विहिरीचा स्लॅब कोसळून तीघांचा मृत्यू

Subscribe

धार्मिक विधी साठी विहिरीवर

विलेपार्ले पूर्व येथे विहिरीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात काही महिला विहिरीत पडल्याची घटना आज सायंकाळी घडली. रुईया बंगला या खाजगी परिसरात ही विहिर आहे. धार्मिक विधीसाठी या विहिरीवर काही महिला जमल्या होत्या. विहिर जूनी असल्यामुळे स्लॅब तुटून या महिला विहिरीत पडल्या. या घटनेनंतर तात्काळ अग्नीशमनदल आणि पोलिस दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत ७ ते ८ महिलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत तिघींचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माधवी विजय पांडे – वय ४९ वर्षे, दिव्या – वय ३ वर्षे, रेणू उदीलाल यादव – वय २० वर्षे अशी मयत महिलांची नावे आहेत. या परिसरात अंधार असल्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.


कशी घडली घटना

हिंदी भाषिक महिला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ही पूजा करतात. या पूजेत महिला दोन दिवसांचा उपवास ठेवतात. हा उपवास सोडण्यासाठी त्या विहिरीवर पूजा करतात. आज सायंकाळी या विहिरीवर पूजा सुरु होती. पूजेदरम्यान ३५ महिला या विहिरीवर उपस्थीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. स्लॅब कोसळल्यानंतर महिलांनी पळ काढला. मात्र काही महिला विहिरीत पडल्या. या घटनेनंतर मदतकार्य सुरु करण्यात आले.

- Advertisement -

“सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. उत्तर भारतीय समाजाच्या महिला पूजा विहिरीवर पूजा करत होत्या. ही पूजा आई आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी करतात. खाजगी मलमत्ता असल्यामुळे या विहिरीत या पूर्वीही अनेकदा पूजा झाल्या आहेत. स्लॅब कोसळल्यानंतर येथे उपस्थीत असलेल्या महिलांना प्रसंगावधान दाखवत सांड्याच्या सहाय्याने काही महिलांना वाचवले.”- स्थानिक रहिवासी

अग्नीशमनदलाचे बचावकार्य सुरु

घटनास्थळी एनडीआरएफ व मुंबई अग्नीशमन दलाचे बचाव कार्य सुरु आहे. या बचावकार्यात त्यांना पाच महिलांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. तर, तीन महिलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. या मृतदेहांना कुपर हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. तर जखमीनां व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मृत महिला नावे:-
१) माधवी विजय पांडे (स्री वय- ४९ वर्षे),
२) दिव्या (स्री वय- ५ वर्षे),
३) रेणू उदीलाल यादव (स्री वय- २० वर्षे)

जखमी महिलांची नावे:-
१) मेहक गुप्ता (स्री वय- ११ वर्षे)
२) चंदा गुप्ता (स्त्री वय- ३८ वर्षे)
३) गीता गुप्ता (स्त्री वय- ३६ वर्षे)
४) सुमीत्रा गुप्ता (स्त्री वय- ४७ वर्षे)
५) माधुरी (स्त्री वय- ४८ वर्षे)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -