घरताज्या घडामोडी'या' कारणामुळे प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवरून आडनाव हटवले

‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवरून आडनाव हटवले

Subscribe

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूड व्यतिरिक्त हॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. १० वर्षांपासून प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये काम करत आहे. अलीकडेच प्रियांकाने हॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. याशिवाय प्रियांकाने इन्स्टाग्रामवरून जोनस आडनाव का हटवले? हे सुद्धा सांगितले होते.

जेव्हा प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवरून जोनस हे आडनाव हटवले होते, तेव्हापासून यामागचे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच आता आमिर खान नंतर प्रियांका चोप्रा देखील निक जोनससोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र आता प्रियांकाने स्वतः इन्स्टाग्रामवरील आडनाव हटवण्या मागचे कारण सांगितले आहे. याबाबत तिला विचारल्यावर ती म्हणाली की, ‘माझे युजरनेम माझ्या ट्विटरसोबत मॅच व्हावे, एवढीच माझी इच्छा होती. लोकांसाठी हा इतका मोठा मुद्दा बनल्यामुळे मी हे पाहून खूप हैराण झाली. हा सोशल मीडिया आहे यार. त्यामुळे तुम्ही सर्व चील राहा.’

- Advertisement -

हॉलिवूडमधील कामाबद्दल प्रियांकाने सांगितले की, ‘दक्षिण आशियाई कलाकार असल्याने हॉलिवूडमध्ये जास्त काम करण्याची संधी मिळत नाही. व्यावसायिक चित्रपटात प्रमुख भूमिका करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी खूप काम करण्याची गरज असते. मी हॉलिवूडमध्ये १० वर्षांपासून काम करत आहे आणि आता मला जे काम करायचे आहे, ते मी करत आहे. तुम्हाला जगाला दाखवण्यासाठी खूप काम करावे लागते. दक्षिण आशियाई कलाकार काय डिजर्व करतात हे त्यांना दाखवावे लागते.’


हेही वाचा – २२ व्या मजल्यावरून पडून अभिनेत्रीचा मृत्यू, हत्या की आत्महत्या, गूढ वाढले

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -