घरमनोरंजनआर. माधवन साकारणार वैज्ञानिकाची भूमिका

आर. माधवन साकारणार वैज्ञानिकाची भूमिका

Subscribe

अभिनेता आर माधवन याने आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे. "रॉकेट्री" असे चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट इस्रोचे वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.

अभिनेता आर. माधवन याने आपल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग सुरु केले आहे. हा चित्रपट इस्रोचे वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली असल्याचा फोटो आर. माधवनने नुकताच आपल्या खासगी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. “तुमच्या आर्शिवादाची गरज” असल्याचे त्याने या फोटोखाली लिहिले आहे. माधवन या चित्रपटात मुख्य भूमिका, दिग्दर्शन आणि लेखनही करणार आहे. माधवनने या चित्रपटाची शुटिंग मागीलवर्षी सुरु केली होती. या चित्रपटाच्या काही भागाची शुटिंग पूर्ण झाली आहे. आर माधवनला नंबी यांची भूमिका साकारण्यासाठी १४ तास मेकअप करावा लागत आहे. अभिनय आणि दिग्दर्शन एकाच वेळी करणे हे माधवनसमोर एक मोठे आव्हान आहे.

 

View this post on Instagram

 

Need all you BLESSINGS ..???????❤️❤️❤️❤️???

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

काय म्हणाला माहदेवन

“रॉकेट्री हा चित्रपट अनेक कारणांमुळे माझ्या हृदयाजवळ आहे. हा चित्रपट चांगला आकार घेत आहे. नंबी नारायणन यांची कथा लोकांसमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे.”- अभिनेता आर. माधवन

- Advertisement -

कोण आहेत नंबी नारायण

नंबी नारायणन यांना देशात क्रायोजेनिक रॉकेट इंजिनचे ‘भीष्म पितामह’ म्हणून संबोधले जाते. मात्र पहिल्यांदा जेव्हा त्यांनी या तंत्राचा शोध लावला तेव्हा त्यांना अटक करण्यात आले होते. रॉकेट टेकनिक देशाबाहेर घेऊन जाणे आणि पाळत ठेवण्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आलेत. सीबीआय चौकशीनंतर त्यांना दोषमुक्त करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -