घरमनोरंजनRaj Kundra Case : राज कुंद्राला शर्लिन चोप्राच बोल्ड कंटेंट इंडस्ट्रीत घेऊन...

Raj Kundra Case : राज कुंद्राला शर्लिन चोप्राच बोल्ड कंटेंट इंडस्ट्रीत घेऊन आली, गहना वशिष्ठचा आरोप

Subscribe

पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची दोन महिने तुरुंगाची हवा खात जामिनावर बाहेर आला आहे. राज कुंद्राच्या सुटकेनंतर आता पॉर्नोग्राफी प्रकरणात संशयित आरोपी अभिनेत्री गहना वशिष्ठ त्याच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे. या प्रकरणात गहना वशिष्ठलाही यापूर्वी मालाडमधून करण्यात आली होती. याप्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राचेही नाव घेण्यात आले, मात्र शर्लिन सुरुवातीपासून राज कुंद्राच्या विरोधात आहे.

अशातच आता गहना वशिष्ठने शर्लिन चोप्रावर गंभीर आरोप केले आहेत. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत गहना वशिष्ठ बोलत होती. यावेळी गहनाने शर्लिन चोप्राला पॉर्नोग्राफी प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ असल्याचे म्हणत तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गहनाने म्हटले की, शर्लिन चोप्राला लाईमलाईटमध्ये राहणे अधिक आवडते म्हणूनच ती राज कुंद्राला लक्ष्य करतेय. जेणेकरुन ती या प्रकरणात आरोपीच्या रुपात समोर येऊ नये. गहना पुढे म्हणाली की, शर्लिन चोप्राने राज कुंद्राचे आभर मानले पाहिजेत, मात्र ती त्याच्यावर आरोप करतेय.

- Advertisement -

गहना शर्लिनवर गंभीर करत म्हणाली की, ‘शर्लिन चोप्रा राज कुंद्रावर यासाठी आरोप करतेय जेणेकरून ती बोल्ड कंटेंट प्रकरणातील आरोपी म्हणून बाहेर येऊ नये. पण ती आता शिल्पा शेट्टीबद्दलही पर्सनल स्टेटमेंट देतेय, शिल्पा शेट्टीने विचार केल्यास ती शर्लिनविरोधात सहजपणे अब्रु नुकसानीचा दावा ठोकू शकते. मात्र तिला इतके महत्त्व देणे शिल्पाला योग्य वाटत नाही. शर्लिन एक कृतघ्न व्यक्ती आहे. तिने राज कुंद्रासारख्या व्यक्तीलाही सोडले नाही ज्याने तिला पैसे कमवण्यास मदत केली.

गहना पुढे सांगते की, ‘शर्लिन जी जीवनशैली जगते. ज्यासाठी तिने आर्म्सप्राईम अॅपमधून पैसे कमवले. हे अॅप कंटेंट डेव्हलपसाठी वापरले जायचे. त्यामुळे शर्लिनने राज कुंद्राचे आभार मानले पाहिजेत आणि त्याची पूजा केली पाहिजे. कारण ती आज आहे ती राज कुंद्रामुळेच आहे. सत्य तर हे आहे की, राज कुंद्राला शर्लिन चोप्राच बोल्ड कंटेंट इंडस्ट्रीत घेऊन आली होती. कारण ती २०१२ पासूनचं पॉर्न आणि बोल्ड कंटेंटसाठी काम करत होती. त्यानंतर अडीच वर्षांनंतर ती राज कुंद्राला भेटली.

- Advertisement -

Booster shots : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला Covid-19 विरोधी ‘बूस्टर डोस’


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -