घरमनोरंजनतुम्हाला पूर्ण गोष्ट माहिती नाही तर गप्प राहा...राज कुंद्राचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

तुम्हाला पूर्ण गोष्ट माहिती नाही तर गप्प राहा…राज कुंद्राचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Subscribe

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरूद्ध मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफीप्रकरणात तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली. तुरूंगातून सुटल्यानंतर राज कुंद्राने याप्रकरणाबाबत एक वर्षानंतर आपलं मत मांडलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीसाठी मागील वर्ष खूप वाईट होतं. राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा काही काळासाठी कुठेही दिसून आली नाही. दरम्यान, सध्या शिल्पाचा पती राज कुंद्रा तुरूंगातून बाहेर आल्यापासून आपला चेहरा वेगवेगळ्या मास्कने झाकलेला दिसतो. त्याचे हे चित्रविचित्र मास्क पाहून अनेकजण त्याला ट्रोल करू लागले आहेत. दरम्यान, तरुंगातून बाहेर येऊन एक वर्ष झाल्यानंतर राज कुंद्राने एक ट्वीट करून ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

एकावर्षानंतर राज कुंद्राने केलं ट्वीट
मागच्या वर्षी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरूद्ध मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफीप्रकरणात तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली. तुरूंगातून सुटल्यानंतर राज कुंद्राने याप्रकरणाबाबत एक वर्षानंतर आपलं मत मांडलं आहे. राज कुंद्राची एका वर्षापूर्वी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी आर्थर रोड तुरूंगातून सुटका करण्यात आली होती. ज्यानंतर आता राज कुंद्राने आपलाच एक फोटो शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

राज कुंद्राने केलं ट्वीट

राज कुंद्राने ट्वीटरवर आपला एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आज अर्थर रोडमधून बाहेर येऊन पूर्ण एक वर्ष झालं. ही वेळेची गोष्ट आहे. मला लवकरच न्याय मिळेल. सत्य सर्वांसमोर लवकरच येईल. मी आपल्या शुभचिंतकांचे धन्यवाद मानतो आणि ट्रोलर्संचे सुद्धा धन्यवाद करतो. ज्यांनी मला ट्राँग करतो.” तसेच खाली त्याने लिहिलंय की, “जर तुम्हाला पूर्ण गोष्ट माहिती नाही तर गप्प राहा.” असं राज कुंद्राने लिहिलं आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

सोनम कपूरच्या मुलाचं पार पडलं बारसं; फोटो शेअर करत ठेवलं ‘हे’ अनोखं नाव

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -