घरमनोरंजनफोटोनंतर राखी सावंत आणि आदिलच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

फोटोनंतर राखी सावंत आणि आदिलच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

मनोरंजन गोष्टीतील ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. नुकतीच राखी ‘मराठी बिग बॉस’ या कार्यक्रमातून बाहेर आली. त्यानंतर तिने तिच्या आईचे हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर करत आईला ब्रेन ट्यूमर असल्याचे सांगितले. दरम्यान, अशातच आता राखीने आणखी एक खुलासा केला आहे. राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

व्हायरल होत असेल्या या व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना दिसत आहेत. शिवाय दोघे यावेळी खूप आनंदी देखील दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले असून तिला शुभेच्छा देत आहेत.

- Advertisement -

7 महिन्यांपूर्वीच झालं होतं राखी आणि आदिलचं लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

मागील काही महिन्यांपासून राखी आणि आदिल सतत चर्चेत असतात. अनेकदा विविध ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात येतं. तसेच दोघे अनेकदा सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबूली देखील देत असतात. परंतु आत्ता व्हायरल होत असला हा व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा असल्याचं म्हटलं जात आहे. 29 मे 2022 रोजी राखी आणि आदिलने कोर्ट मॅरेज केलं.

- Advertisement -

दरम्यान, राखीचं हे दुसरं लग्न आहे. याआधी राखीने रितेश सोबत लग्न केलं होतं. परंतु त्याचं आधी एक लग्न झाल्याचे कळताच राखीने त्याच्या सर्व सबंध तोडले.

 

 


हेही वाचा :

राखी सावंत आणि आदिलच्या लग्नाचे फोटो व्हायरल; मे 2022 मध्ये केलं होतं कोर्ट मॅरेज

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -