घरमनोरंजनDrugs Case: राकुल प्रीत सिंह ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

Drugs Case: राकुल प्रीत सिंह ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

Subscribe

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांची नावे देखील ईडीच्या यादित समाविष्ट आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणामध्ये टॉलिवूड (tollywood)आणि बॉलिवूडमधील(bollywood drug case) अनेक लोकप्रिय दिग्दर्शक तसेच कलाकारांना समन्स पाठवला आहे.यामध्ये राकुल प्रीत सिंह(rakul preet singh),राणा दग्गुबाती,रवि तेजा, पुरी जगन्नाख यांचा समावेश आहे. यासोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांची नावे देखील ईडीच्या यादित समाविष्ट आहेत अशी माहिती समोर येत आहे.दरम्यान अभिनेत्री राकुल प्रीत सिंहने आज हैद्राबादमधील ईडी कार्यालायात आज हजेरी लावली (rakul preet singh arrives at the office of ed)असून राकुलची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्स प्रकरणामध्ये देखील रकुल प्रीत सिंहचीही चौकशी यापूर्वी देखील करण्यात आली होती.(ED has summoned rakul preet singh and rana daggubati in drug case)

- Advertisement -

टॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी सर्व कलाकारांना वेगवेगळ्या तारखेनुसार ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. , राणा दग्गुबाती 8 सप्टेंबर, रवि तेजा 9 संप्टेंबर, पुरी जगन्नाथ (दिग्दर्शक) 31 सप्टेंबर या तारखे प्रमाणे वेळेत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहा असा समन्स बजावण्यात आला आहे. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017मध्ये 30 लाख रुपयांचे आंमली पदार्थ जप्त केले होते. यानंतर त्यांनी तब्बल 12गुन्हे दाखल केले होते. यापैकी 11 प्रकरणामध्ये आंमली पदार्थ तस्करांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


हे हि वाचा – सिद्धार्थच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत होतोय ट्रेन्ड,काय आहे कारण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -