घरमनोरंजनपाहिलात का रणवीरचा सद्गुरुबरोबरचा 'हा' डान्स

पाहिलात का रणवीरचा सद्गुरुबरोबरचा ‘हा’ डान्स

Subscribe

रणवीरचा नुकताच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंगळूरुमध्ये आध्यात्मिक गुरू 'सद्गुरु' यांच्याबरोबर मजेशीर अंदाजात रणवीर नाचताना दिसत आहे.

रणवीर सिंह जिथेही जातो तिथे फक्त मजेशीर किस्सेच घडताना दिसतात. कोणीही असो रणवीरला कधी कोणी नकार देऊ शकत नाही. रणवीर सिंह एक असा कलाकार आहे, जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर साहजिकच हास्य घेऊन येतो. रणवीरची एनर्जी जबरदस्त असल्यामुळं तो जिथे जाईल तिथे असा कोणतातरी व्हिडिओ असतोच, जो व्हायरल होईल. रणवीरचा नुकताच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंगळूरुमध्ये आध्यात्मिक गुरू ‘सद्गुरु’ यांच्याबरोबर मजेशीर अंदाजात रणवीर नाचताना दिसत आहे.

- Advertisement -

 

एका इव्हेंटच्या निमित्तानं आले एकत्र

रणवीर आणि गुरु जग्गी वासुदेव हे आयआयएम बंगलोरच्या माजी विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमामध्ये आयआयएमबीयुमध्ये गेले होते. ‘सेन्सिंग द फ्युचर’ या कार्यक्रमातील हा मजेशीर व्हिडिओ रणवीरनं स्वतःच्या ट्विटवरच पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर आणि गुरू एकमेकांबरोबर अतिशय आनंदात नाचताना दिसत आहेत. दोघांनीही स्टेजवर बराच वेळ एकमेकांसह गप्पा तर मारल्याच, पण मजेशीर डान्सही केला. इतकंच नाही तर डान्स झाल्यानंतर गुरुंनी रणवीरची गळाभेटही घेतली. या इव्हेंटमध्येच एका चाहत्यानं रणवीर डान्स करण्याची विनंती केली होती. मात्र मस्करीत रणवीरनं त्याला आपण डान्सचे किती पैसे घेतो हे माहीत आहे का? असंही विचारलं. मात्र त्या चाहत्याला नाराज न करता त्यानं हा मजेशीर डान्स केला.

- Advertisement -

सध्या ‘सिम्बा’च्या चित्रीकरणात व्यस्त

रणवीर सिंह सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट याचवर्षी डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर लवकरच त्याचा आलिया भट्टबरोबरचा ‘गुली बॉय’ प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ या चित्रपटातही रणवीर सिंह असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -