घरमनोरंजनरोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर!

रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर!

Subscribe

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे पुरस्कार यंदा जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. कवी,लेखक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रु. रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृती चिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

- Advertisement -

आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. गांधी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली कस्तुरबा गांधी या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. रंगभूमीवरही रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयाची जादू दिसली. सध्या नटसम्राट हे नाटक त्या रंगभूमीवर साकारत आहेत. त्याचप्रमाणे ‘चार दिवस सासूचे’, ‘वहिनीसाहेब’, ‘सख्या रे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांना २ फिल्मफेअर,एक नॅशनल अॅवॉर्ड मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -