घरमनोरंजनअर्पिता शर्माच्या EID पार्टीत धोनीची पत्नी आणि मुलीच्या लूकवर चाहते फिदा

अर्पिता शर्माच्या EID पार्टीत धोनीची पत्नी आणि मुलीच्या लूकवर चाहते फिदा

Subscribe

संपूर्ण देशभरात ईदीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कलाकारांनी आपल्या चाहत्यांना खास अंदाजात ईदीच्या शुभेच्छा दिल्या. सलमान खान ते शाहरुख खान यांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. तर याच खास दिवसानिमित्त काही कलाकारांनी आपल्या घरी ईदी पार्टी ठेवली होती.

प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही सलमानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्माने आपल्या घरी ईदची पार्टी ठेवली होती. या पार्टीत बॉलिवूड ते क्रिकेट विश्वातील काही नामांकित लोकांनी उपस्थिती लावली होती. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाने ही पार्टीत उपस्थिती लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्माने ईद पार्टीत महेंद्र सिंहची पत्नी साक्षी आणि तिची मुलगी आली असता त्या दोघांच्या लूककडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी साक्षीने क्रिम रंगाचा सिंपल लहंगा घातला होता. तर झिवाने सुद्धा तिच्या आईच्या ड्रेसला मॅचिंग असाच ड्रेस घातला होता.

- Advertisement -

साक्षी आणि झिवाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियात चाहत्यांनी त्या मायलेकींची तारीफ केलीचय पण झिवा किती मोठी झाली आहे अशी सुद्धा काहींनी कमेंट केलीयं.

 


हेही वाचा- सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ची यूएस-कॅनडात रेकॉर्ड ब्रेक कमाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -