घरताज्या घडामोडीजळगावात ५० खोक्यांची 'गुलाबो गॅंग', संजय राऊतांची गुलाबराव पाटलांवर टीका

जळगावात ५० खोक्यांची ‘गुलाबो गॅंग’, संजय राऊतांची गुलाबराव पाटलांवर टीका

Subscribe

जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. ज्यांनी ५० ते १०० कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे जळगावमधले चार ते पाच प्रमुख लोकं आहेत. जे शिवसैनिकांच्या मेहरबानीने जिंकून आले आणि मग विकले गेले. या गुलाबो गँगचे जे सरदार आहेत ते सर्वकाही मानतात. ते धमक्या देत असतील तर देऊ द्या. पण जळगाव ही सुवर्णनगरी आहे. त्या सुवर्णनगरीत काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते. परंतु ते दगडच निघाले. त्याला काय करणार?, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर केली.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळ ते म्हणाले की, आजच्या सभेत त्यांचा आम्ही भांडाभोड करू, अशी भीती त्यांच्या मनामध्ये आहे. माझ्या हातामध्ये जे कागद आहेत. ते जळगावच्या पालकमंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी जी अफाट खरेदी केली, त्यामध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन आणि त्याचे काही साहित्य आहेत. म्हणजे २ लाखांचे व्हेंटिलेटर्स हे १५ लाखांना खरेदी केले. हे सर्व कागद आता माझ्या हातात आहेत.

- Advertisement -

विधानसभा आणि विधान परिषदेत यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. परंतु हे सर्व प्रकरण दाबलं जात आहे. साधारणपणे ४०० कोटींचा घोटाळा या माणसानं कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना केला. हे सर्व कागद त्यांच्याच माणसांना आम्हाला आणून दिले आणि हे सर्व कागद पाहून मला धक्काच बसला, असं संजय राऊत म्हणाले.

आपल्या जिल्ह्यातल्या रुग्णांचे जीव वाचवायचे सोडून हे महाशय प्रत्येक गोष्टीत दबाव आणून खरेदी करून घेत होते. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा कागद आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचार हा व्हेंटिलेटर खरेदीमध्ये करण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण आता बाहेर येईल. तुम्ही मारा दगड, लोकं तुमच्यावर दगड मारतील. ही त्यांची भीती आहे.

- Advertisement -

दादा भुसे यांचं प्रकरणंही सीबीआयकडे पाठवलं आहे. पण बघू काय होतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं एक आव्हान आहे की, ते म्हणतात गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण निर्माण झाली आहे. कसली अडचण निर्माण झालीये. तुमच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार आणि गुन्हेगार मोकाट आहेत. तुमच्या मंत्रिमंडळात आणि मांडीला मांडी लावून अनेक गुंड तुमच्यासोबत बसले आहेत. मग तुम्ही आम्हाला काय सांगताय?, हे सर्व प्रकरण आम्ही बाहेर काढू. किरीट सोमय्या यांनीही मी हा कागद पाठवणार आहे, असंही राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेतून ठाकरे कोणार निशाणा साधणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : राजकीय भूकंप झाल्यानंतर मला टेन्शन येतं, पंकजा मुंडेंचं मोठं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -