बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खान पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीमध्ये सापडला आहे. अंधेरीच्या न्यायालयात सलमानविरोधात मारहाण आणि दरोड्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पत्रकार अशोक पांडे यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी दरोडा, हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
Mumbai: A criminal complaint has been filed against actor Salman Khan by one Ashok Pandey before Metropolitan Magistrate Court, Andheri, for robbery, assault, criminal mischief & criminal intimidation.
— ANI (@ANI) June 25, 2019
मंगळवारी रात्री सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्ड विरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पांडे यांनी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती मात्र, न्हा नोंदवला जात नसल्याने पांडे यांनी थेट न्यायालय गाठले.
१२ जुलैला होणार प्रकरणाची सुनावणी
सलमान खान आणि बॉडीगार्ड शेराविरोधात भा. दं. वि. ३२३, ३९२, ४२६, ५०६, आणि ३४ या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आला असून १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती पांड्ये यांचे वकील नीरज गुप्ता आणि निशा आरोरा यांनी दिली.
या कारणाने सलमानविरूद्ध केली तक्रार दाखल
सलमान खान डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता त्यावेळी एका व्यक्ती त्याचा पाठलाग करत व्हिडिओ बनवत असल्याने त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच शिवीगाळ केली असा आरोप देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, अंधेरीच्या डी एन नगर परिसरात बुधवारी संध्याकाळी सलमान खान सायकल चालवत असताना अशोक पांड्ये यांनी त्याचा जवळपास १५ ते २० मिनीटे पाठलाग करत व्हिडिओ बनवला. यावेळी सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी तक्रार दाखल करून सलमान व त्याच्या बॉडीगार्डविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.