घरमनोरंजनएका चित्रपटासाठी 100 कोटी घेणाऱ्या सलमानने एकेकाळी 75 रुपयांसाठी केलं होतं 'हे' काम

एका चित्रपटासाठी 100 कोटी घेणाऱ्या सलमानने एकेकाळी 75 रुपयांसाठी केलं होतं ‘हे’ काम

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदूर येथे सलमानचा जन्म झाला होता. वयाच्या 23 व्या वर्षी सलमानने बॉलिवूडमध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत सलमानचे करोडो चाहते आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण सलमानच्या स्टाईलचे चाहते आहेत.

‘मैने प्यार किया’ चित्रपटातून मुख्य भूमिकेला सुरुवात
1989 साली ‘मैने प्यार किया’ हा सलमानचा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री होती. आजही या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. सलमानच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. सध्या सलमान बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता आहे.

- Advertisement -

75 रुपये होती सलमानची पहिली कमाई

सलमान खानसलमान त्याच्या प्रत्येक चित्रपटामागे 100 कोटींपेक्षा जास्त पैसे घेतो. परंतु एकेकाळी सलमानची पहिली कमाई केवळ 75 रुपये होती. त्याने मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. त्यावेळी त्याला हे पैसे मिळाले होते. याबाबत एका मुलाखतीत सलमानने खुलासा केला होता. तर ‘मैने प्यार किया’ या पहिल्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटासाठी सलमानने 31 हजार रुपये घेतले होते.

- Advertisement -

सलमान खानचे ‘हे’ आहेत ब्लॉकबस्टर चित्रपट
90 च्या दशकापासून सलमानने मैने प्यार किया, साजन, हम आपके है कौन, करण-अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या, दबंग, बॉडीगार्ड, एक था टाइगर आणि बजरंगी भाईजान यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

सलमान अभिनेताचं नव्हे तर व्यावसायिक देखील आहे.
आज सलमान कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे. अभिनयासोबतच सलमान एक व्यावसायिक देखील आहे. सलमानचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. ज्याचे नाव सलमान खान फ्लिफ्म असं आहे. शिवाय सलमानचे एक ब्राँड देखील आहे. या व्यतिरिक्त सलमान विविध जाहिरातींमधून देखील करोडो रुपये कमावतो.

 


हेही वाचा :

2022 मध्ये ‘या’ सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -