घरमनोरंजनसंजय-माधुरी २१ वर्षांनंतर एकत्र

संजय-माधुरी २१ वर्षांनंतर एकत्र

Subscribe

मनोरंजनाविषयी बातम्या वाचा एका क्लिकवर .......

२१ वर्षांपूर्वी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये आले होते. खलनायक त्यानंतर महानता ही काही नावे. त्यानंतर एवढ्या मोठ्या काळानंतर ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटात ही जोडी पडद्यावर येणार आहे. मात्र त्यांचा एकत्र असलेला एकही सीन चित्रपटात नसल्याची चर्चा होती. मात्र त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून या दोघांचे संवाद असलेले अनेक प्रसंग कलंकमध्ये आहेत. या चित्रपटांत आलिया भट आणि वरुण धवन ही तरुण जोडीही झळकणार आहे. आलिया आपले शूटींग पूर्ण करून रणबीर कपूरसोबत आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुल्गारियाला रवाना झाली. कलंकमध्ये माधुरी एका गाण्यावर नृत्य करणार आहे. तर हे गाणं सरोज खान आणि रेमो डिसुझानं कोरिओग्राफ केलं आहे. ‘कलंक’ची कथा यश जोहर यांना १५ वर्षांपूर्वी सुचली होती. त्यानंतर करण जोहरने त्यावर काम सुरू केले आणि हा चित्रपट आता तयार होत आहे. पुढील वर्षी 19 एप्रिल, 2019ला प्रदर्शित होणार आहे.


‘तानाजी’ बनणार १०० कोटींत 

मुंबई ।  द अनसंग वॉरियर’ची मोठी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. अजयने यातील मध्यवर्ती भूमिकेसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. या चित्रपटांत सैफ अली खान झळकणार होता. पण काही कारणाने त्याचा रोल तेलुगुतला सुपरस्टार जगपती बाबू करणार आहे. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये तानाजीचे चित्रिकरण सुरू आहे. जगपतीचे चित्रपटांतील प्रसंगाचे शूटींग सुरू झाले आहे. तर अजय देवगणच्या भूमिकेचे शूटींग पुढील महिन्यात केले जाणार आहे. मराठीतील ओम राऊत तानाजी..चं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचे बजेट १०० कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे. स्वतः अजय या रोलसाठी खूप उत्सूक आहे. नरवीर तानाजींचा इतिहास महाराष्ट्राला परिचित आहे. कोंढाणाची लढाई तानाजींनी त्यासाठी लावलेली प्राणाची बाजी हा सर्व इतिहास महाराष्ट्राला स्फूर्ती देणारा आहे. तानाजी हे बारा हजार सैनिकांच्या पायदळाचे सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत तानाजी मालुसरे हे नावही महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासात अजरामर झाले आहे.

- Advertisement -

सलमानच्या लग्नासाठी शहारुख उत्सुक

मुंबई । सलमानच्या ‘दस का दम’ या रियालिटी शोमध्ये शहारुख खान छोट्या पडद्यावर भेटणार आहे. त्यावेळी शहारुखने सलमानच्या लग्नाच्या चर्चेबाबत त्याला छेडले असता दोघांमध्ये या मुद्यावरून भरपूर थट्टामस्करी झाली. शहारुखने यावेळी खुलासा केला की, त्याने सलमानच्या लग्नासाठी काही प्लान करून ठेवले आहेत. आणि मलाही सलमानच्या लग्नाबाबत उत्सुकता असल्याचे त्याने स्पष्ट केले.  यावेळी अभिनेता सुनील ग्रोव्हरनं ‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ यांच्या कार्यक्रमाचं विनोदी विडंबन केलं. यात त्यानं शाहरुखला प्रश्न विचारला की, ‘समजा की, सलमानजीचे लग्न आहे, त्यामध्ये शाहरुख खान काय करेल? त्यासाठी उत्तरात असे मजेदार ऑप्शन होते. 1) बडी बडी शादियों मे छोटे-छोटे रसगुल्ले, बनाये जाते है म्हणतील 2) वरातीत नागिन डान्स करत असतील. 3) रडणार्‍या मुलींना गप्प करत असतील, यावर शहारुख म्हणाला, सलमानच्या लग्नानंतर ज्या मुली रडतील त्यांना मी सोबत घेईन, शहारुखच्या या उत्तरावर सेटवर मोठा हास्यस्फोट झाला.


‘स्त्री’ चा बॉक्स ऑफीसवर दबदबा

- Advertisement -

मुंबई । राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ ने बॉक्स ऑफीसवर दुपटीने कमाई केली आहे. या चित्रपटाचं बजेट केवळ २० कोटी आहे. तर सिनेमानं चौथ्या दिवसांपर्यंत ४१ कोटींचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे कमी वेळेत सर्वाधिक कमाई करणारा स्त्री ठरला आहे. माऊथ पब्लिसिटीमुळे ‘स्त्री’ पहायाला जाणार्‍यांची गर्दी होत आहे. समीक्षकांनीही या चित्रपटांच कौतूक केले आहे. त्यामुळे हा सिनेमा २०१८ मध्ये सर्वाधिक नफा कमावणार्‍या सिनेमांच्या यादीत दाखल झाला आहे.राजकुमार राव ला एका सोलो हिटची गरज होती. त्यामुळे त्याला ‘स्त्री’च्या यशाचा मोठा फायदा होणार आहे. तर श्रद्धा कपूरही चित्रपटाच्या यशामुळे आनंदात आहे. या सिनेमा येत्या काळात ८० कोटींपर्यंत नफा कमावण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा एक विनोदी हॉररपट आहे.


सेलिनाला एका पोस्टचे मिळतात २४ कोटी!!

वॉशिंग्टन |सामान्यतः फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग आणि गुगलचा वापर लोक आपले सोशल नेटवर्क वाढवण्यासाठी करतात. परंतु काही सेलेब्स असे आहेत, जे एका पोस्टमधून कोट्यवधी रुपये कमावतात. यातील एक म्हणजे हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर सेलिना गोमेज. एका मासिकाच्या रिपोर्टनुसार २६ वर्षांची सेलिना प्रत्येक पोस्टवर ३.५ मिलियन डॉलर (२४कोटी रुपये) कमावते. ती डिफरेंट ब्रँडचे फुटवेअर, स्निकर्स, जॅकेटसोबतच इतर आउटफिट्ससोबतच फोटोज शेअर करते. अमेरिकन सिंगर सेलिना गोमेज एक अशी सेलिब्रिटी आहे, जिचे सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. ती सिंगिंगसोबतच डिज्नी चॅनलचे एमी पुरस्कार विजेता टेलीव्हजन मालिका विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेस मध्ये अ‍ॅलेक्स रुसोच्या भूमिकेसाठीही ओळखली जाते. ती सेलिना गोमेज अँड द सीन नावाच्या पॉप बँडची मेन सिंगर आहे.सप्टेंबर २०१७ मध्ये सेलिनाची किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. तिची फ्रेंड फ्रान्सिया रेसियाने तिला आपली किडनी दिली होती. किडनीच्या आजारामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आता किडनी ट्रान्सप्लांटनंतर ती एकदम ठिक झाली आहे.


कंगनावरील आरोपावर भडकला मणिकर्णिकाचा दिग्दर्शक

मुंबई । फिल्म -मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी चे निर्माता कमल जैन यांच म्हणणे आहे की, दिग्दर्शक क्रिश यांनी या सिनेमासाठी मेहनत घेतली आहे. आपल्या नव्या सिनेमात व्यस्त असल्यामुळे अभिनेत्री कंगना रानौत यांना सिनेमातील पॅचवर्क पूर्ण करण्यासाठी आणि काही दृश्य चित्रित करण्यासाठी योग्य मानले आहे. सिनेमाबद्दल होणार्‍या चर्चांना पूर्ण विराम देताना कमल जैन यांनी सांगितले की, शेवटचं शेड्यूल पाहिल्यानंतर असा अंदाज आहे की, आणखी काही गोष्टी शुट करण्याची गरज आहे. मात्र क्रिश, तोपर्यंत आपल्या पुढच्या प्रोजेक्टला तारखा देऊन झाला होता. कंगनाने अगदी सुरूवातीपासून या सिनेमाशी जोडलेली असल्यामुळे पुढील जबाबदारी उचलण्यासाठी ती योग्य व्यक्ती असल्याचे जाणवले. यामुळे हा प्रोजेक्ट हायजॅक झालेला नाही. त्यामुळे घेतलेला प्रत्येक निर्णय हा निर्माता आणि स्टुडिओच्या समर्थनातला आहे. काही दिवसांपूर्वी लेखक अपूर्व असरानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनावर निशाणा साधला होता. यावर आता दिग्दर्शकाने सडेतोड उत्तर देत चर्चेला पूर्णविराम दिलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -