घरताज्या घडामोडीसारा-अक्षय कुमारच्या 'अतरंगी रे'च्या शूटिंगला सुरुवात

सारा-अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’च्या शूटिंगला सुरुवात

Subscribe

सारा अली खान आणि अक्षय कुमारने सेटवरचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खानने चित्रपट ‘अतरंगी रे’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे. ‘अतरंगी रे’मध्ये अभिनेता धनुष प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काही तासांपूर्वीचे सारा अली खान आणि अक्षय कुमार ‘अतरंगी रे’च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खिलाडी अक्षय कुमारने सारासोबतचा सेटवरील फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘हे तीन जादूचे शब्द, लाईट, कॅमेरा, Action यामध्ये जो आनंद आहे, त्याचे काही मुल्य नाही आहे. ‘अतरंगी रे’चे शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे. आता तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.’ तसेच यासोबत अक्षयने सांगितले की, ‘संगीत सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान करत आहे. या चित्रपटाचे लेखन हिमांशू शर्माने केले आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

यापूर्वी सारा अली खानने फोटो शेअर करत लिहिले की, ”अतरंगी रे’ आणखीन रंगीन झाले आहे. अक्षय कुमारसोबत काम करताना खूप आनंद, उत्सुकता आहे.’ या फोटोमध्ये सारा अली खान आणि अक्षय कुमार दोघे एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहे.

- Advertisement -

‘अतरंगी रे’ या चित्रपटाची घोषणा वर्षाच्या सुरुवातीला झाली होती. तसेच मार्च महिन्यात वारासणीत शूटिंगला सुरुवात होणार होती. पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. सारा अली खानने पहिल्यापासूनच शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या टीमने ऑक्टोबरपासून प्रोडक्शनला सुरुवात केली, ज्यानंतर दुसरे शेड्यूल मदुरईमध्ये शूटिंग होणार आहे.


हेही वाचा – आदित्यच्या ‘ओमः द बॅटल विदिन’ चित्रपटचा पहिला लूक प्रदर्शित

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -