घरताज्या घडामोडीसारा, श्रध्दाला कार आणि कुरीअरने पोहचवले ड्रग्ज, करमजीतने केला खुलासा!

सारा, श्रध्दाला कार आणि कुरीअरने पोहचवले ड्रग्ज, करमजीतने केला खुलासा!

Subscribe

सुशांतसिंग राजपुत मृत्यूप्रकरणाचा तपास ड्रग्ज एँगलने सुरू आहे. यामुळे अनेक बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रध्दा कपूर, रकुल प्रित सिंग, सीमोन खंबाटा अशा अनेकांचे ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. त्यात एणसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज पेडलर करमजीतने आणखी खुलासे केले आहेत. या अभिनेत्रींना तो कारमध्ये ड्रग्ज पुरवत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. एनसीबीच्या चौकशीत अनेकांची नावं घेतली आहेत. त्यातील दोघी म्हणजे सारा आणि श्रध्दा.

श्रध्दाच्या नावावर चार ठिकाणी ड्रग्ज पुरवले जायचे

करमजीतने श्रध्दाबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. श्रध्दाच्या नावावर चार वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज पार्सल पोहचवले. आणि चारही वेळा त्याने गाडीत पार्सल दिलेत, असा दावा करमजीतने चौकशीत केला आहे. मात्र हे पार्सल श्रध्दाने स्वत:साठी घेतले होते की दुसऱ्याकोणासाठी याची कल्पना नाहीये. यानंतर एनसीबीने श्रध्दाला समन्स जारी केला. उद्या शनिवारी एनसीबी तिची चौकशी करणार आहे.

- Advertisement -

सारालाही पुरवले ड्रग्ज

करमजीतने श्रध्दाबरोबर सारा अली खानलाही ड्रग्ज पुरवल्याचा दावा केला आहे. सारा अली खानला दोनदा ड्रग्ज पुरवले आहेत. आणि दोन्हीवेळी कुरीअरच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले आहेत. असा दावा करमजीतने केला आहे. करमजीतच्या दाव्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी एनसीबीने सारा ला समन्स बजावला आहे. सारालाही उद्या चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

आज शुक्रवारी अभिनेत्री रकुलप्रित सिंहची चौकशी केली. चार तासांच्या या चौकशीत रकुलने रियाला दोषी ठरवले. मी ड्रग्ज घेत नाही. ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा संबंध नाही असा दावा तीने यावेळी केला. तीने सगळं खापर रियाच्या डोक्यावर फोडले. रिया चॅटच्या माध्यमातून ड्रग्ज मागवत होती. तीने ते माझ्या घरी ठेवले होते. पण माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

- Advertisement -

उद्या दीपिकाची चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा विषय समोर आल्याने त्यासंबंधीचा तपास एनसीबीकडून होत आहे. त्यातच सिनेतारकांचे व्यवस्थापन करणाऱ्या एका एजन्सीशी संबंधित असलेली जया शाह ही रियाशी अमली पदार्थांसंबंधी संपर्कात होती. सुशांतला अमली पदार्थांची मात्रा कशी द्यावी, याबाबत रिया आणि जया यांच्यातील मेसेज संभाषण तपास संस्थेच्या हाती लागले आहे. त्यावरूनच एनसीबीने जया शाह हिची बुधवारी चौकशी केली. रियाच्या चौकशीत जी नावे समोर आली होती, त्यांची उलट तपासणी जयाकडून करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण व सारा अली खानसह चार अभिनेत्रींना नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. या दोघीही काल गोव्यावरून मुंबईत दाखल झाल्या आहेत.


हे ही वाचा – धक्कादायक! चिकन- मटण का खातेस विचारलं, म्हणून मैत्रीणीच्या डोक्यात बिअर बॉटल फोडली!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -