घरक्रीडालोकेश राहुल आगामी काळात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो - गंभीर

लोकेश राहुल आगामी काळात टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो – गंभीर

Subscribe

राहुलने बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली.

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम शतकी खेळी केली. त्याने या सामन्यात ६९ चेंडूत १३२ धावा केल्या. कर्णधार म्हणून कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. त्याच्या या विक्रमी खेळीच्या जोरावर पंजाबने हा सामना ९७ धावांनी जिंकला. तसेच राहुल यंदा पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत एखाद्या संघाचे नेतृत्व करत असून बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याने कर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली. कर्णधार म्हणून राहुलने घेतलेल्या निर्णयांनी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला प्रभावित केले. राहुल आगामी काळात भारताचे नेतृत्व करू शकतो, असे मत गंभीरने व्यक्त केले.

राहुलला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे

कर्णधार म्हणून तुम्हाला प्रत्येक सामन्यात यश मिळेलच असे नाही. कोणत्याही संघाचे नेतृत्व करताना सतत चढ-उतार येत राहतात. मात्र, राहुल उत्कृष्ट कर्णधार आहे असे मला वाटते. विराट कोहलीचे वय आता ३० वर्षांहून अधिक आहे. रोहित शर्माही ३० वर्षांहून अधिक वयाचा आहे. त्यामुळे आगामी काळात या दोघांव्यतिरिक्त भारतीय संघाचे नेतृत्व कोण करू शकेल असा खेळाडू शोधावा लागेल. कर्णधार म्हणून राहुलला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

कसोटी कामगिरीत सुधारणा गरजेची 

राहुलला वेळ दिला, पाठिंबा दिला, तर तो कर्णधार म्हणून यशस्वी होईल. मात्र, भारतीय संघाचे नेतृत्व करायचे असल्यास त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणे गरजेचे आहे. कसोटी संघात त्याला अजून त्याचे स्थान पक्के करता आलेले नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याने कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे, असेही गंभीरने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -