घरताज्या घडामोडीकाय म्हणता? देवमाणूस मधली सरू आजी अंध नाही?

काय म्हणता? देवमाणूस मधली सरू आजी अंध नाही?

Subscribe

सरु आजी आणि तिच्या गावरान शिव्या प्रेक्षकांमध्ये चांगल्याच पसंतीस पडल्या आहेत

सध्या मालिकेच्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे देवमाणूस. फार कमी वेळेत देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे. एसीपी दिव्याने देवीसिंग म्हणजेच अजित कुमार देवला ताब्यात घेतले आहे. त्याचावर कोर्टात खटला सुरु आहे. मालिकेत सर्व अजित कुमारच्या बाजूने बोलत असले तरी एक व्यक्ती अगदी पहिल्या दिवसापासून अजित कुमारच्या विरोधात बोलत आली आहे ती म्हणजे सरु आजी. काळा चश्मा लावलेली सरु आजी आणि तिच्या गावरान शिव्या प्रेक्षकांमध्ये चांगल्याच पसंतीस पडल्या. मालिका सुरु झाल्यापासून सरु आजीला नक्की दिसत नाही का? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.  ( Saru Aaji not blint? interesting twist in Devmanus marathi serial )

- Advertisement -

सध्या अजित कुमारवर कोर्टात खटला सुरु आहे आणि अजित कुमार स्वत:चा खटला स्वत:च लढत आहे. अजित कुमारच्या कोर्टाच्या पुढच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरू आजीची साक्ष घेण्यात येणार आहे. मालिकेच्या आगमी भागात अजित कुमार सरू आजीला दिसत असल्याचे सिद्ध करणार आहे. सरू आजी अंध असल्याचे नाटक करुन तिला स्पष्ट दिसत असल्याचे सिद्ध करण्यासाठी अजित सरू आजीच्या दिशेने पेपरवेट फेकून मारताना दिसणार आहे. सरू आजीला दिसते हे सिद्ध झाल्यानंतर सरू आजीची साक्ष ग्राह्य धरली जाईल का याबाबत आता सर्वांना उत्सुकता आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे आता एसीपी दिव्याच्या अंडर देवीसिंगची केस इन्स्पेक्टर शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता इन्स्पेक्टर शिंदे वकील आर्या हिच्या मदतीने देवीसिंगची लढवणार आहे. गेल्या काही भागात देवीसिंग वकील आर्या सोबतही जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देवीसिंगच्या केसचे नक्की काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा –  ‘देवमाणूस’ मालिका रंजक वळणावर! एसीपी दिव्या सिंग आता मालिकेत दिसणार नाही

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -