घरमनोरंजन'पठाण'च्या अनधिकृत प्रदर्शनावर पाकिस्तानातील सिंध सेन्सॉर बोर्डाकडून बंदी

‘पठाण’च्या अनधिकृत प्रदर्शनावर पाकिस्तानातील सिंध सेन्सॉर बोर्डाकडून बंदी

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. 11 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. फक्त भारतातच नव्हे तर पठाणची भुरळ आता पाकिस्तानमधील प्रेक्षकांना देखील पडली आहे. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये बेकायदेशीररीत्या ‘पठाण’ चित्रपट दाखवला जात असल्याची बातमी समोर आली होती. शिवाय पाकिस्तानमध्ये या चित्रपटाची एक तिकिट 900 रुपयांना विकले जात असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, आता पाकिस्तानमधील सिंध सेन्सॉर बोर्डाने पठाण चित्रपटावर बंदी आणली आहे.

पाकिस्तानमध्ये ‘पठाण’ चित्रपट दाखवण्यास सिंध सेन्सॉर बोर्डाकडून बंदी

pathaan pakistan

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी प्रेक्षकांना देखील ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. मात्र, मागील चार वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी पाकिस्तान सोडून इतर अनेक देशांमध्ये ‘पठाण’ प्रदर्शित झाला होता. परंतु तरीही ‘पठाण’ पाकिस्तानमधील कराची येथे चोरुन दाखवला जात होता. त्यासाठी प्रेक्षक 900 रुपयांचे एक तिकिट खरेदी करण्यासाठी देखील तयार झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये यूके बेस्ड असलेल्या फायरवर्क इवेंट्स कंपनीने फेसबुक पोस्ट करुन ‘पठाण’च्या चित्रीकरणाची माहिती दिली होती. ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी 900 रुपये देऊन तिकिटं बुक केली होती. मात्र, ही बातमी सिंध सेन्सॉर बोर्डापर्यंत पोहोचताच त्यांनी या प्रायव्हेट स्क्रिनिंग दाखवण्याऱ्या फेसबुक पेजचा शोध घेतला. या सेन्सॉर बोर्डाने स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, जोपर्यंत कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण करण्याचे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत कोणीही याचे चित्रीकरण करु शकत नाही. तसेच सिंध
सेन्सॉर बोर्डाने अनधिकृतरित्या चित्रीकरण करण्याऱ्या कंपनीला नोटीस पाठवली असून पठाणचे सर्व शो रद्द करण्याची ताकिद दिली आहे. दरम्यान, या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 400 कोटींचा टप्पा पार केला आहेय. कमावले आहेत. जगभरातून या चित्रपटाने 725 कोटींचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

11 व्या दिवशीही ‘पठाण’ची जोरदार कमाई; गल्ल्यात जमले ‘इतके’ कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -