घरमनोरंजनसोनाली रूपेरी पडद्यावर साकारणार,सुलोचना दिदी!

सोनाली रूपेरी पडद्यावर साकारणार,सुलोचना दिदी!

Subscribe

'आणि..काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदींच्या भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते… ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. चित्रपटात अभिनेता सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भुमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोज्वळ सुलोचना दिदी साकारत आहे. वायकॉम १८ मोशन पिक्चर्स यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले आहे.

- Advertisement -

कोण होत्या सुलोचना लाटकर ?

काशीनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन यांची आई म्हणजेच सुलोचना दिदी. १९४३ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, आणि त्यानंतर त्यांनी सोज्वळ, शांत आणि घरंदाज भुमिका पडद्यावर जिवंत केल्या. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भुमिका केल्या. आजपर्यंत २५० हून अधिक  मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भुमिका केल्या आहेत. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ या चित्रपटातील त्यांची भुमिका विशेष गाजल्या. ७ नोव्हेंबरला ‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुलोचना दिदींच्या भुमिकेत दिसणार आहे.

कोण होते काशीनाथ घाणेकर?

काशीनाथ घाणेकर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाव. मराठी रंगभूमीला काशीनाथ घाणेकर यांनी वैभव मिळवून दिले. मराठी रंगभूमीला काशीनाथ घाणेकर यांनी एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवले. महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा प्रवास विलक्षण आणि थक्क करणारा आहे. हाच प्रवास रुपेरी पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे ही भुमिका साकारत आहे.

- Advertisement -

नाटक, चित्रपटातील भूमिका गाजल्या

ज्येष्ठ कलाकार डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कितीतरी भूमिका अजरामर झाल्या आहेत. यामध्ये ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘आनंदी गोपाळ’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मधुमंजिरी’ या नाटकांचा समावेश आहे. तर ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘पडछाया’, ‘अभिलाषा’, ‘मराठा तितुका मेळावा’, ‘भव्य’, ‘पाठलाग’, ‘झेप’, ‘मधुचंद्र’, ‘देव माणूस’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -