घरमुंबईभावाची अवयवदानाची इच्छा, बहिणीने केली पूर्ण!

भावाची अवयवदानाची इच्छा, बहिणीने केली पूर्ण!

Subscribe

रुग्णाची आई प्रमिला मेहता आणि बहिण राजेश्री मेहता यांनी जितेन मेहता यांच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांचं यकृत, किडनी आणि कॉर्निया( डोळे) हे अवयव दान करण्यात आले.

दिवसेंदिवस समाजामध्ये अवयवदानाबाबतची जनजागृती वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी यावर्षीचं ३७ वं अवयवदान यशस्वीरित्या  पार पडलं. मुंबईतील जूहू येथील क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयात हे अवयवदान करण्यात आलं आहे. अंधेरीतील ५१ वर्षीय जितेन मेहता यांना रविवारी सकाळी अचानक चक्कर आली आणि ते कोसळले. त्यांना तात्काळ जुहू येथील क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचवेळी त्यांना स्ट्रोकचा झटका आल्याचं निदान करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. काही तपासण्या केल्यानंतर ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचं समोर आलं. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं.

कुटुंबियांचा पुढाकार

रुग्णाची आई प्रमिला मेहता आणि बहिण राजेश्री मेहता यांनी जितेन मेहता यांच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. भावाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर लगेचच त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यकृत, किडनी आणि कॉर्निया( डोळे) हे अवयव दान करण्यात आले. हृदय आणि त्वचा काही कारणास्तव दान करता आलेलं नाही. या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळालं आहे. या व्यक्तीचे यकृत ज्युपिटर रुग्णालयात, एक किडनी क्रिटिकेअर रुग्णालयात आणि कॉर्निया आय बॅंकेत पाठवलं. तर दुसरं मूत्रपिंड वापरता आलेलं नाही.

- Advertisement -

“माझ्या भावाची अवयवदानाची इच्छा होती. ती मी पूर्ण केली आहे. त्याचे अवयवदान केल्यामुळे तो जिवंत असल्याची भावना कायम राहिल. मला काही झालं तर माझे अवयवदान करा असं त्याने सांगितलं होतं. माझ्या भावाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी वैद्यकीय चाचण्या करून मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास सांगत रुग्णाला वाचवणं कठीण असल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला.” – राजेश्री मेहता, जितेन मेहता यांची बहिण

याविषयी क्रिटिकेअर रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक समीर विजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ आजही समाजात अवयवदानाबाबत जनजागृती पाहायला मिळत नाही. शिवाय एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर नातेवाईकांना समजावून त्यांची अवयवदानाबाबतची परवानगी मिळणं गरजेचं असतं. यांच्या नातेवाईकांनीच आधी अवयवदान करण्यासाठी सल्ला मागितला होता. त्यांच्या आईने मोठ्या मनाने हा निर्णय घेतला. मेंदूच्या विकारामुळे त्यांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -