घरमनोरंजननीतू कपूरकडून रणबीरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

नीतू कपूरकडून रणबीरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 41 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार आणि चाहते रणबीर कपूरला शुभेच्छा देत आहेत. मात्र, या सगळ्यात रणबीर कपूरची आई नीतू कपूरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये नीतू कपूर रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

नीतू कपूरकडून रणबीरला खास शुभेच्छा

Ranbir Kapoor

- Advertisement -

रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशातच, आज त्याचा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्याची आई नीतू कपूरनेशुभेच्छा देणारी एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने स्टोरीमध्ये दोन केकचे फोटो पोस्ट केले आहेत, एका केकसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा फोटो शेअर केला आहे. यानंतर त्यांनी रणबीरचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सगळ्याशिवाय नीतू कपूरने सेलिब्रेशनचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार रणबीर

‘अॅनिमल’ या चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर कपूर’ ब्रह्मास्त्र 2′ सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट यावर्षी 1 डिसेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा : ‘या’ कारणामुळे परिणीती-राघव यांनी हनिमून केले पोस्टपोन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -