घरमनोरंजनमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुली अन्यायकारक, अभिनेते मिलिंद दास्तांनी व्यक्त केला संताप

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुली अन्यायकारक, अभिनेते मिलिंद दास्तांनी व्यक्त केला संताप

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे मुंबई-पुणेकरांचा प्रवास अगदी सुखकर झाला आहे. अवघ्या तीने ते चार तासांत मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबईपर्यंत जात येत असल्याने या मार्गावरील वाहनांची गर्दी दिसेंदिवस वाढतेय. मात्र या प्रवासादरम्यान अनेक जण थोडा ब्रेक घेण्यासाठी थांबतात. या ठिकाणच्या फुड स्टॉलवर चहा- नाश्ता करतात. बरेच जण प्रवासादरम्यानच्या लोणावळ्यात ब्रेक घेतात. मात्र या मार्गावरून लोणावळ्यात उतरताणा वसुल केल्या जाणाऱ्या टोल वसुलीविरोधात आता मराठी अभिनेते मिलिंद दास्तांनी संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रवासादरम्यान अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे.

मिलिंद दास्ताने म्हणाले की, काही कामानिमित्त ते मुंबईहून पुण्याला गेले होते. त्यावेळी खालापूर टोलनाक्यावर फास्ट टॅगमधून २०३ रुपये तर तळेगाव टोल नाक्यावर ६७ रुपये असे एकूण २७० रुपये कापले गेले. यावर त्यांनी आक्षेप व्यक्त न करता ते काम आटपून पुण्याहून मुंबईला परत येत असताना तळेगाव टोलनाक्यावर २०३ रुपये कापले गेले. त्यानंतर पुन्हा तळेगाव टोक्यावर ६७ रुपये कापले गेले. यावेळी तळेगाव टोकनाका सोडून पुणे लोणावळ्यात खाली उतरुन त्यांनी ब्रेक घ्यायचे ठरवले. थोडावेळ वेळ ब्रेक घेऊन ते लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने बाहेर पडताच येणाऱ्या टोलवर त्यांच्याकडून १३५ रुपये फास्ट टॅगमधून कट केले. यावेळी त्यांच्या अकाउंटमधील बॅलन्स कमी असल्याचे सांगण्यात आले. खरंतर एका ट्रीपमध्ये 270 रुपयांचा टोल पडायला हवा. पण या पुण्यातून मुंबईत येता येता आधी २०३.. मग १३५ असे पैसे कट झाल्याने पुढे बॅलन्स कमी झाला ही लूट आहे.’ अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

याप्रकरणी त्यांनी खालापूर टोल नाक्यावर जाब विचारला असता त्यांनी तिथल्या टोलवरील लोकांनी सांगितले की, गेल्या १० दिवसांपासून हा नवा नियम लागू झाला आहे. त्यामुळे केवळ तासभर लोणावळ्यात उतरलो म्हणून एक्सप्रेस वेवरील आधीचा काढलेला टोल रद्द करणे याला काही अर्थ नाही. ही लूटच आहे. त्याबाबत त्यांनी तेथील तक्रार बुकमध्ये लेखी तक्रार केली आहे. लोणवळ्यात तासभर थांबलो म्हणून १३५ रुपयांचा टोल घेणे आणि पुन्हा एक्सप्रेस वेवर २०३ रुपयांचा टोल घेणे अन्यायकारक आहे.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

एक व्हिडिओच्या माध्यमातून दास्ताने यांनी याबाबत दाद मागितली आहे. लोणावळ्यात उतरल्याने एक्स्प्रेस वेवरचा टोल रद्द होण्याचा प्रकार घडल्याने प्रवासी नागरिकांनी याची नोंद घेऊन जागरुक राहावं असं आवाहनही दास्ताने यांनी केलं आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -