घरताज्या घडामोडीsunny deol birthday: यामुळे १६ वर्ष शाहरुख खानसोबत बोलला नाही सनी देओल

sunny deol birthday: यामुळे १६ वर्ष शाहरुख खानसोबत बोलला नाही सनी देओल

Subscribe

चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते यश चोप्रा (Yash Chopra) यांचा चित्रपट ‘डर’ (Darr)मध्ये अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) एक प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. तर अभिनेता शाहरुख खानने चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती. पण या चित्रपटाच्या प्रर्दशनानंतर सनी देओल खूप रागात होता आणि त्याने जवळपास १६ वर्ष शाहरुख खानसोबत बोलला नाही, हे खूप कमी लोकांना माहित आहे. आज सनी देओल ६५वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने ‘डर’मधील हा किस्सा नेमका काय आहे? ते पाहूयात.

‘डर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सनी देओल रागवण्याचे कारण शाहरुख खानची भूमिका होती. आप की अदालत या शोमध्ये सनी देओलने ‘डर’ चित्रपटासंबंधित एक जुनी गोष्ट शेअर केली होती. यादरम्यान सनी देओलने सांगितले की, चित्रपटात सनी देओलची भूमिका ज्याप्रकारे प्रक्षेकांना दर्शवण्यात आली, त्यावर शाहरुख खानची राहुल मेहराची भूमिका वरचढ झाली होती. त्यामुळे दिग्दर्शक यश चोप्रा यांना सनी देओलने आपले मत स्पष्ट केले आणि त्यावेळेस तो खूप रागावला होता. चित्रपटातील क्लायमॅक्स सीनशी सनी अजिबात सहमत नव्हता. यामध्ये कमांडो भूमिका करणाऱ्या व्यक्तीवर राहुल मेहरा चाकूने मारताना दिसतो.

- Advertisement -

सनी देओल म्हणाला की, या सीनमुळे माझी यश चोप्रा यांच्यासोबत भांडणं झाली होती. मी समजवण्याचा त्यांना प्रयत्न केला की, चित्रपटात मी कमांडो ऑफिसर आहे. माझी भूमिका एक्सपर्ट आणि फिट आहे. तर हा मुलगा मला सहजपणे कसे काय मारू शकतो? जर मी त्याला पाहिले नाही तर तो मला हरवू शकतो. जर तो मी पाहताना सुरा घुसवत आहे, तर मला कमांडो म्हटले जाणार नाही. एवढे सनीने समजवूनही यश चोप्रा यांनी त्यांच्या गोष्टींना प्राधान्य दिले नाही आणि त्यांना जे हवंय तेच त्यांनी केलं. यामुळे सनी देओल खूप चिडला आणि त्याने हाताच्या नखांनी पॅन्ट फाडली. यावर सनी देओल म्हणाला की, मला कळाले देखील नाही की, मी रागाच्याभरात स्वतःची पॅन्ट फाडली आहे.

हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिटही ठरला. पण सनी देओलला यांची शंका होती, तेच झाले. शाहरुख खानची भूमिका त्याच्यावर वरचढ ठरली. त्यानंतर सनी देओलने १६ वर्ष शाहरुख खानसोबत बोलला नाही आणि शाहरुखही सनी देओलशी बोलला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – शाहरुखसोबत काम करण्याची ऑफर समांथाने धुडकावली


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -