घरमनोरंजनभारतातील सर्वात बिग बजेट चित्रपट '२.०'!

भारतातील सर्वात बिग बजेट चित्रपट ‘२.०’!

Subscribe

सायन्स फिक्शनवर आधारीत २.० या चित्रपटाचा टिझर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दाखवला जाणार आहे. तब्बल ५०० कोटींचा खर्च या चित्रपटावर करण्यात आला आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’ हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर उद्या, १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर दाखवला जाणार आहे. चित्रपटात आंतरराष्ट्रीय पातळीवरील वीएफएक्सचा वापर करण्यात आला असून फक्त त्यावरच तब्बल ५४ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटावर आतापर्यंत ५४३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. अद्याप या चित्रपटाचे प्रमोशन बाकी असून त्याचे प्रमोशन देशासह परदेशातही करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचं बजेट वाढण्याची शक्यता आहे.

परदेशातून ३ हजार टेक्निशिअन्स आले

सर्वाधीक खर्च केलेला २.० हा चित्रपट भारतातील बिग बजेट सिनेमा बनला आहे. दोन भाषांमध्ये हा सिनेमा बनवण्यात आला आहे. तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शीत करण्यात येणार आहे. त्यानंतर हा सिनेमा दहा भाषांमध्ये डब केला जाईल. हिंदी ‘२.०’ हा चित्रपट करण जोहर आणि अनिल थडानी यांची कंपनी प्रदर्शीत करणार असून या चित्रपटातील स्पेशल इफेक्टकरता देशभरातून ३ हजार टेक्निशिअन्सना बोलावण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरपासून टीझरपर्यंत सर्वकाही भव्य बनवण्याचा दावा निर्माते करत आहेत. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल १० महिन्यांचा जास्त कालावधी लागला असून आता हा सिनेमा २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर त्याचा ट्रेलर दिवाळीच्या निमित्ताने येणार असून टिझर हा ‘३ डी’मध्ये दाखवला जाणार आहे.

- Advertisement -

‘रोबो’चा रिमेक ‘२.०’ 

यापूर्वी अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आगामी चित्रपट ‘२.०’ मधील स्वतःचा लुक आपल्या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. ‘२.०’ या चित्रपटाचे टिझर येण्यासाठी केवळ ४ दिवसांचा अवकाश असल्याचे त्याने या पोस्टरसोबत नमूद केले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रजनीकांत हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदा एकत्र आले आहेत. रजनीकांत यांच्या २०१० साली आलेल्या ‘रोबो’ या चित्रपटाचा ‘२.०’ हा रिमेक असल्याचे सांगितले जाते. चित्रपटात अभिनेत्री एमी जॅक्सनदेखील भूमिका साकारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -