घरदेश-विदेशपाकिस्तानने कुलभूषण जाधवच्या मदतीचे मार्ग रोखले - परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानने कुलभूषण जाधवच्या मदतीचे मार्ग रोखले – परराष्ट्र मंत्रालय

Subscribe

पाकिस्तानने कैदेत ठेवलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कायदेशीर मदतीचे मार्ग रोखले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाला विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरावर सांगितले की, गुप्तहेरीच्या खोट्आ आरोपाखाली पाकिस्तानने कैदेत ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात याचिका दाखल करण्याचा भारताचा प्रयत्न पाकिस्तान फोल ठरवत आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, आपल्या काऊंसिलर अधिकाऱ्यांना जाधव याची कायदेशीर कागदपत्रे देण्यास आडकाठी करण्यात आली. तसेच त्याच्याकडून रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यासाठी पावर ऑफ अटर्नी घेऊ शकले.

पाकिस्तानच्या वतीने हे सांगण्यात आले आहे की, वकिलांमार्फत आम्ही कागदपत्रे घेऊ शकतो. भारताने तेही केले. मात्र आमच्या पाकिस्तानी वकिलांनी अधिकाऱ्यांकडे एफआयआर, चार्जशीट, फील्ड मार्शलच्या आदेशाची पत्र मिळावी यासाठी अर्ज केला. मात्र ते देण्यास त्यांनी नकार दिला. कोणताही मात्र दिसत नसल्याने भारताने १८ जुलै रोजी कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या वकिलांनी सांगितले की, पावर ऑफ अटर्नी आणि इतर कागदपत्रांशिवाय आपण हे पिटीशन दाखल करू शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याच्या तारखेबाबत गुप्तता ठेवली आहे. आधी त्यांनी सांगितले की १९ जुलैनंतर ते पिटीशन दाखल करू शकत नाही, नंतर ते म्हणाले की २० जुलैला रोजी पिटीशन दाखल करण्याचा कार्यकाळ संपणार आहे. भारतानेही आधी ऑर्जिनेंसमधील कमतरता पाहून जूनमध्येच आपल्या अडचणी दाखवल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा –

ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगारांची Antigen test होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -