घरCORONA UPDATEतिने कोरोनाला हरवले; पण कुटुंबातील इतरांचा कोरोनाने घेतला बळी

तिने कोरोनाला हरवले; पण कुटुंबातील इतरांचा कोरोनाने घेतला बळी

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे भारतात आता मृत्यूचा आकडा ३० हजाराच्या पुढे गेलेला आहे. अनेकांनी आपल्या जवळचा व्यक्ती तर काहींचे संपुर्ण कुटुंब कोरोनाने गिळंकृत केले आहे. ओडिशातील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एक महिला कोरोनाला हरवून घरी परतली, मात्र घरी आल्यावर तिला धक्काच बसला. तिचा पती, सासू-सासरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ही बातमी समजल्यानंतर त्या महिलेवर आभाळच कोसळले.

ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील दिगापहांदी या भागात राहणारी अनुराधा पाणीग्रही अनेक दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत होती. अनुराधा, तिचा पती जितेंद्र पात्रा आणि सासू-सासऱ्यांनी ९ जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या सर्वांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानंतर एका पाठोपाठ जितेंद्र पात्रा यांची आई आणि वडिलांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. १५ जुलै रोजी अनुराधा यांच्या सासू जानकी पात्रा यांचा मृत्यू झाला. १८ जुलै रोजी सासरे कृष्णा चंद्रा पात्रा यांचे निधन झाले. तर २० जुलै रोजी पती जितेंद्र यांनाही कोरोनाने गिळंकृत केले.

ओडिशातील गंजम जिल्हा हा कोरोनाचे संक्रमण झालेला सर्वात पहिला जिल्हा आहे. ओडिशामध्ये आतापर्यंत ६ हजार ३६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ६२ लोकांचा मृत्यू झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -