घरमनोरंजन'पोस्टमॉर्टमच्या १०-१२ तास आधीच सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू!'

‘पोस्टमॉर्टमच्या १०-१२ तास आधीच सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू!’

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याला कित्येक दिवस उलटून गेल्यानंतरही त्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालात अभिनेता यांच्या निधनाच्या वेळेचा उल्लेख नाही, ज्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता इंडिया टुडेच्या वृत्तानुसार पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी ५ ऑगस्टला मुंबई पोलिसांना असे सांगितले की, पोस्टमॉर्टमच्या १०-१२ तास आधी सुशांतचा मृत्यू झाला होता.

या वृत्तानुसार, डॉक्टरांनी ५ ऑगस्टला मुंबई पोलिसांना सांगितले होते की, पोस्टमॉर्टमच्या १०-१२ तास आधी अभिनेत्याचा मृत्यू झाला. १४ जून रोजी रात्री ११.३० वाजता सुशांतचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. इंडिया टुडेच्या अहवालानुसार सुशांतच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख अ‍ॅटॉप्सी अहवालात करण्यात आला नव्हता आणि एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची ४ सदस्यांची टीम या अहवालावर आपले मत व्यक्त करणार आहे. सुशांतची कूपर रूग्णालयात अ‍ॅटॉप्सी झाली होती.

- Advertisement -

सुशांतच्या हाउसकीपरने सुशांतच्या शेड्यूलबद्दल सांगितले…

सुशांतच्या हाउसकीपर नीरजने असे सांगितले की, ‘८ जून रोजी केशव सर्वांसाठी जेवण बनवत होता. आम्ही जेव्हा डिनर सर्व्ह करणार होतो तेव्हा रिया माझ्याकडे आली आणि मला तिची बॅग पॅक करण्यास सांगितले. त्यावेळी रिया खूप रागावली होती. ती म्हणाली की उरलेले कपडे नंतर घेऊन जाईल. त्यानंतर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसोबत रात्रीचे जेवण न करता ती निघून गेली. त्यानंतर सुशांत संपूर्ण वेळ त्याच्या खोलीत होते. त्यानंतर ज्या दिवशी रिया गेली, त्याच दिवशी सुशांत सरांची बहीण मितू सिंग घरी आली होती’

रिया-सुशांतच्या रोजचे वेळापत्रक सांगताना नीरज म्हणाला, “लॉकडाउन सुरू होताच रिया सुशांत सरांसोबत राहू लागली. ती मधेच तिच्या आई-वडिलांना भेटायची किंवा तिचे पालक इथे यायचे. लॉकडाउनमध्ये रिया आणि सुशांत सर दोघे उठून ब्लॅक कॉफी प्यायचे आणि मग वर्कआउट करण्यासाठी टेरेसवर जात असायचे. दुपारचे जेवण झाल्यावर दोघेही योगाकरिता टेरेसवर जात असत. मग ते गेल्यावर मी टेरेस स्वच्छ करायचो. केशव रात्रीचे जेवण बनवून मग झोपायला जात असे. हा त्याचा रोजचा दिनक्रम होता.”


सोनिया गांधी देणार अध्यक्षपदाचा राजीनामा? CWC च्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -