घरदेश-विदेशलष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी चीनला खडसावले; म्हणाले, कारवाईचा पर्याय खुला

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी चीनला खडसावले; म्हणाले, कारवाईचा पर्याय खुला

Subscribe

लडाख परिसरातील चीनकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्यास भारताला लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे, असे वक्तव्य संरक्षण दलांचे प्रमुख CDS बिपीन रावत यांनी व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच वाढला. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने बोलणी सुरु आहेत. मात्र, लडाखच्या अनेक भागांमध्ये भारतीय हद्दीतील सैन्य मागे घेण्यास चीन अद्याप तयार नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत लष्कर प्रमुख यांनी चीनला खडसावले आहे.

काय म्हणाले CDS बिपीन रावत

दोन देशांमधील लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेतून काही तोडगा निघाला नाही. चर्चा निष्फळ ठरली तरच लष्करी पर्याय वापरावा लागेल, असे बिपीन रावत हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हणाले. सीमारेषेबद्दल वेगवेगळ्या धारणेमुळे एलएसीवर अतिक्रमण होते. संरक्षण दलांवर सीमेवर लक्ष ठेवण्याची, टेहळणीची आणि अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी असते. अशा कुठल्याही घटनेवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा आणि घुसखोरी रोखण्याचा मार्ग सरकारकडून अवलंबला जातो. संरक्षण दलं लष्करी कारवाईसाठी नेहमीच सज्ज असतात, असेही बिपीन रावत म्हणाले. तसेच लडाखमध्ये आधी होती, तशी जैसे थे स्थिती कायम व्हावी यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी असणारे सर्वजण उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार करत आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona Vaccine: रशियानंतर चीननं शोधली लस, आपत्कालीन स्थितीत लसीला मंजुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -