घरमनोरंजनआगामी 'जेता' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

आगामी ‘जेता’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

सोशल मीडियावर 'जेता'च्या मोशन पोस्टरला पसंती मिळत असून, चित्रपटात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

नेहमीच नवनवीन प्रयोग होत असल्यानं मराठी सिनेसृष्टीचं जगभर कौतुक होत असतं. नव्या दमाचे दिग्दर्शक अनोख्या टायटलखाली आशयघन कथानक सादर करत आहेत. अशा चित्रपटांच्या यादीत आपलं नाव सामील करण्यासाठी ‘जेता’ हा मराठी चित्रपट येत आहे. प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचं नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘जेता’च्या मोशन पोस्टरवरून जाणवतं. सोशल मीडियावर ‘जेता’च्या मोशन पोस्टरला पसंती मिळत असून, चित्रपटात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संजू एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या ‘जेता’ या आगामी चित्रपटाची निर्मिती संजय लक्ष्मणराव यादव यांनी केली आहे. टायटलवरून हा चित्रपट एका विजेत्याची कहाणी सांगणारा असल्याचं जाणवतं. नुकताच ‘जेता’चा मोशन पोस्टर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, अभिनेते सुशांत शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चित्रपटाच्या माध्यमातून एक संघर्षमयी जीवन जगासमोर येणार आहे. या कथेला कर्णमधूर संगीत आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची किनार जोडून बनवलेली एक परिपूर्ण कलाकृती ‘जेता’च्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे.

- Advertisement -

‘जेता’ची कथा संजय लक्ष्मणराव यादव यांनी लिहिली असून, योगेश सबनीस आणि योगेश महाजन यांच्यासोबत संजय लक्ष्मणराव यादव यांनीच पटकथा लेखन केलं आहे. संवादलेखन संजय लक्ष्मणराव यादव आणि योगेश सबनीस यांनी केलं आहे. नीतिश चव्हाण, स्नेहल देशमुख, शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे आदी कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. अनिकेत के. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, हर्षद वैती यांनी संकलन केलं आहे. मेकअप देवा सरकटे यांनी केला असून, कॅास्च्युम्स प्रतिभा गुरव आणि दीक्षिता थोरे यांनी केले आहेत. नंदू मोहरकर या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर लोकेन ल्युटेर साऊंड डिझाइनर आहेत.


 हेही वाचा :अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशचा ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -