घरताज्या घडामोडीThe Railway Men: भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर आधारीत यशराज फिल्मची पहिली वेब...

The Railway Men: भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर आधारीत यशराज फिल्मची पहिली वेब सीरिज येणार

Subscribe

आज भोपाळ दुर्घटनेला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्ताने या दुर्घटनेवर आधारित वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अग्रगण्य फिल्म निर्मिती कंपनी यशराज फिल्म आता ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. कंपनीची नवीन फ्रेंचायसी YRF Entertainmentच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. जगातील सर्वांत मोठी भोपाळ गॅस  गळती दुर्घटना पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. भोपाळ दुर्घटनेवर आधारित पाच भागांची वेब सिरीज दिग्दर्शक आदित्य चोप्रा प्रेक्षकांसाठी आणणार आहे. ‘द रेल्वे मॅन’ असं या सीरिजचं नाव असणार आहे. सीरिजचा पहिला लुक रिलीज झाला आहे. सीरिजचा पहिला लुकच काळजात धडकी भरवणार आहे.  या वेब सीरिजमध्ये अभिनेता आर माधवन,के के मेनन सारखे कलाकार असणार आहेत. दिग्दर्शक राहूल रवैल यांचा मुलगा शिव रवैल या वेब सीरिजमधून पहिल्यांदा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. YRF Entertainment चा पहिला सर्वात मोठा प्रोजेक्ट असणार आहे. २ डिसेंबर २०२२ ला ही सीरिज होणार आहे.

- Advertisement -

जगाच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठ्या आपत्तीची कहाणी या वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. १९८४ साली भोपाळमध्ये झालेल्या वायुगळतीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.ही वेब सीरिज भोपाळ स्थानकावर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची कहाणी आहे. आज भोपाळ दुर्घटनेला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्ताने या दुर्घटनेवर आधारित वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक आदित्य चोप्रा द रेल्वे मॅन या वेब सीरिजमधून भोपाळ वायू दुर्घटनेत ३७ वर्षांपूर्वी आलेल्या या संकटातून हजारो लोकांचा जीव वाचवणाऱ्या वीरांना सलामी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. द रेल्वे मॅन या वेब सीरिजचं शुटींग डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या सीरिजमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहेत.

यश राज फिल्म्सचे सिनियर वाइस प्रेसीडेंट अक्षय विधान यांनी म्हटलं आहे की, भोपाल वायू दुर्घटना ही जगातील औद्यगिक क्षेत्रातील सर्वांत मोठी आणि वाईट घटना होती. त्या घटनेला आज ३७ वर्ष पूर्ण झाली असली तरी त्या शहारात मात्र आजही परिस्थीती तशीच्या तशी आहे. यश राज फिल्मच्या सर्व प्रेक्षकांसाठी या घटनेचं सर्वोत्तम चित्रण आणण्याचा प्रयत्न आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्वांसाठी ही श्रद्धांजली आहे.

‘द रेल्वे मेन’ ही वेबसिरीज भोपाळ दुर्घटनेतील साहस आणि तिथल्या मानवतेला सलाम करणारी कथा आहे. त्यामुळे ही कथा जगाने ऐकणे महत्त्वाचे आहे. ही कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सर्वोत्कृष्टरित्या पोहचवणं महत्त्वाच आहे जेणेकरुन संपूर्ण जगाला भारतातील या दुर्घटनेमुळे झालेल्या विनाशाची खोली समजेल आता यशराज फिल्म्स ही कथा कशाप्रकारे दाखवतय हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं ठरणार आहे.

काय होती भोपाळ गॅस गळती दुर्घटना? 

 

३ डिसेंबर १९८४ ची पहाट ही जगाच्या औद्योगिक इतिहासातील सर्वांत मोठी दुर्घटना ठरली. मध्यप्रदेशातील भोपाळ मधल्या किटकनाशके तयार करणारी युनियन कार्बोर्ईड फॅक्टरीच्या प्लॉट C मध्ये पहाटेच्या सुमारास गॅस गळती सुरू झाली. वाहणाऱ्या वाऱ्यासह हा गॅस संपूर्ण शहराभर पसरला आणि पहाटेच्या साखर झोपेत असलेले लोक श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. सरकारी माहितीनुसार फॅक्टरीमधून ४० टन वायू गळती झाली होती. या दुर्घटनेमुळे काही तासात तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मात्र आतापर्यंत या शहरात २० हजारांहून अधिक लोकांचे मृत्यू झालेत.

३ डिसेंबर १९८४ च्या रात्री युनियन कार्बोर्ईड फॅक्टरीत रासायनिक प्रक्रियेमुळे टँकवर दाब निर्माण झाला आणि टाकी उघडली गेली आणि वायू गळती झाली. याचा सर्वाधिक फटका हा जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना बसला. लहान मुलं म्हातारे कोतारे वाट मिळेल तशी शहरातून पळ काढत सुटली. अनेक जण खोकत होते. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अनेक लहान मुलं डोळ्यादेखत जीव सोडत होती. अनेक जण रक्ताच्या उलट्या करत होते. रुग्णालयात लोकांची गर्दी वाढत होती मात्र डॉक्टरांना रुग्णांवर कोणते उपचार करावे हे कळत नव्हतं. गॅस गळतीच्या जवळपास ८ तासांनंतर भोपाळला विषायी वायूमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र तोवर अनेकांचे बळी गेले होते. या दुर्घटनेनंतर या भोपाळमध्ये जन्माला आलेल्या पुढच्या अनेक पिढ्यांवर याचा परिणाम पहायला मिळत आहे.


हेही वाचा – Radhe Shyam : प्रभास पूजाची ‘आशिकी आ गई’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -