घरमहाराष्ट्रसंभाजीराजे आणि उदय सामंतांच्या बोटीला अपघात; चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...

संभाजीराजे आणि उदय सामंतांच्या बोटीला अपघात; चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…

Subscribe

उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची ही काही पहिली घटना नाही.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्यांदा त्यांच्या बोटीला अपघात झाला असून यात ते थोडक्यात बचावले आहेत. आज सकाळी अलिबाग येथे येत असताना स्‍पीडबोटीच्‍या कप्‍तानाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात बोट जेटीच्‍या खांबांवर जाऊन आदळली. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही.

उदय सामंत यांनी पत्रकार परीषदेनंतर पत्रकारांशी अनौपचारीक गप्‍पा मारताना हा किस्सा सांगितला. यंदा किल्‍ले रायगडावर ३५० वा राज्‍याभिषेक सोहळा पार पडतो आहे. या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उदय सामंत हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत अलिबागसाठी निघाले होते. राज्‍याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी0 आमदार महेंद्र दळवी, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीसाठी ते सकाळी स्‍पीडबोटीने अलिबागच्या दिशेने निघाले होते.

- Advertisement -

हे ही वाचा : ‘पुरावे दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत’, म्हणत सुषमा अंधारेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

यावेळी समुद्रातून जात असताना बोटीचा वेग कमीच ठेवण्यात आला होता. मात्र मांडवा जेटीजवळ बोट आली असता कप्‍तानाने बोटीचा वेग वाढवला. मात्र, त्‍याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेटीकडे निघाली. सुदैवाने ही बोट जेटीच्‍या खालील भागात शिरली आणि थेट खांबांना जाऊन आदळली. या बोटीत उदय सामंत आणि संभाजीराजे दोघेही होते. दोघेही अगदी थोडक्‍यात बचावले. गियरमध्‍ये बिघाड झाल्‍याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. हा अपघात पाहून जेटीवर असलेले आमदार महेंद्र दळवी आणि त्‍यांचे सहकारी शिवसेनेचे कार्यकर्ते घाबरून गेले होते. पण नंतर चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवत तिला सुखरुप लावली. त्यानंतर सर्वजण बोटीतून खाली उतरले.

- Advertisement -

हे ही वाचा: “पुढील महिन्यात रशियातून स्वस्त तेल येणार”, पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही जानेवारी महिन्यात उदय सामंत बोटीने प्रवास करत असताना अपघात घडला होता. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा असा स्पीड बोटीने प्रवास करत असताना अचानक स्पीड बोट बंद पडली होती. सामंत यांच्या स्वीय साहाय्यकाने तात्काळ दुसरी बोट बोलावलेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. त्यानंतर आज मांडवा जेट्टीजवळ बोटीला अपघात झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -