घरमनोरंजन'या' बॉलीवूड कलाकारांनी नाव बदललं आणि नशीब घडवलं

‘या’ बॉलीवूड कलाकारांनी नाव बदललं आणि नशीब घडवलं

Subscribe

नावात काय आहे असं म्हणतात. पण याच नावांनी बॉलीवूड क्षेत्रात अनेकांचं नशीब घडवलं आहे. यात अनेक अभिनेत्यांबरोबरच नामांकित अभिनेत्रींचाही समावेश आहे.

अभिनेत्यांमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमारपासून दिवंगत अष्टपैलू अभिनेता इरफान खान याच्यासही अनेकांचा समावेश आहे. ज्यांनी बॉलीवूडमध्ये येण्यासाठी आपलं नाव बदललं.

- Advertisement -

यात जुन्या अभिनेत्रींमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा समावेश आहे. आज त्यांचा वाढदिवसही आहे. ६० व्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. माला सिन्हा यांचे खरे नाव आल्डा सिन्हा. पण त्यांना शाळेत डालडा म्हणून चिडवतं. यामुळे त्यांनी नाव बदलले आणि माला हे नाव कायम ठेवले.

- Advertisement -

कियारा आडवाणी
सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा आडवाणी हिंदी बरोबरच तेलगू चित्रपटातील ओळखीचा चेहरा आहे. २०१४ मध्ये बॉलीवडमध्ये येण्यासाठी तिने स्वताचे आलिया नाव बदलले आणि कियारा नाव ठेवले. आलिया भट्ट बरोबर नावाचा गोंधळ नको म्हणून कियाराने नाव बदलले.

प्रिति झिंटा
गालावरील खळी आणि निरागस हास्य यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा हिचे खरे नाव प्रितम सिंग आहे. तिनेही बॉलीवडमध्ये येण्यासाठी नाव बदलले होते.

रेखा
आपल्या काळातील सुपरस्टार असलेली अभिनेत्री रेखा ही प्रोफेशनल लाईफपेक्षा जास्त चर्चेत राहीली ती पर्सनल लाईफमुळे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील प्रेमसंबंधामुळे रेखा कायम मीडियाच्या हेडलाईनमध्ये होती. पण तिच्याबदद्ल फारच कमी जणांना माहित आहे कि तिचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे. रेखा तमिळ अभिनेता रामास्वामी गणेशन आणि पुष्पावल्ली यांची मुलगी आहे. रामास्वामी विवाहीत होते पण त्यांचे पुष्पावल्लीबरोबर अफेयर होते. त्यातूनच तिला दिवस गेले आणि रेखाचा जन्म झाला.

मल्लिका शेरावत

मर्डर या चित्रपटात बोल्ड दृश्यांच्या सर्व सीमा पार करत रातोरात सुरस्टार झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत आज मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण तरीही तिचे अनेक चाहते आहे. तिचे खरे नाव रीमा लांबा आहे. पण बॉलीवूड मध्ये येण्यासाठी तिने नाव बदलले होते.

तब्बू
तब्बूचे खरे नाव तब्बसुम फातिमा हाशमी आहे. १९८५ मध्ये हम नौजवान या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांची तब्बू भाची आहे.

मधुबाला

५० ते ६० च्या दशकात बॉलीवूडवर राज्य करणारी सौंद्याची खाण असलेली अभिनेत्री मधुबाला हीचे खरे नाव मुमताज बेगम होते. पण बॉलीवूडमध्ये येण्यासाठी तिने मधुबाला नाव धारण केले होते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -