घरमनोरंजनबॉलिवूडमधील 'हे' चित्रपट आहेत कारगिल युद्धावर आधारित

बॉलिवूडमधील ‘हे’ चित्रपट आहेत कारगिल युद्धावर आधारित

Subscribe

आत्तापर्यंत कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत

देशभरामध्ये आजच्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. आजपासून २३ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी भारताच्या वीर जवानांनी देशासाठी आपली जीवाची बाजी मारून पाकिस्तानच्या घुसखोरांना आणि सैनिकांना कारगिलपासून हकलावून लावले होते. या खास दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी वीरगति प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या बलिदानची आठवण काढत विजय दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस ऑपरेशन विजयच्या सफलतेचे प्रतीत मानले जाते.

आत्तापर्यंत कारगिल युद्धाचा थरार अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. तसेच या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

- Advertisement -

धूप
धूप चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटाची कथा एका शहिद जवानाच्या कुटुंबावर आधारित होता.

लक्ष्य
अभिनेता ऋतिक रोशनचा लक्ष्य चित्रपट देखील कारगिल युद्ध कथेवर आधारित होता. हा चित्रपट खरंतर काल्पनिक होता, मात्र यामध्ये कारगिल युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली होती.

- Advertisement -

मौसम
अभिनेता शाहिद कपूरचा मौसम चित्रपट देखील काल्पनिक कथेवर आधारित होता, परंतु यामध्ये सुद्धा कारगिल युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली होती. यामध्ये प्रेमकथा आणि देशप्रेम सुद्धा दाखवण्यात आलं होतं.

गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल
अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘गुंजन : द कारगिल गर्ल’ सक्सेना चित्रपटात शौर्य चक्र विजेती गुंजन सक्सेना यांची भूमिका साकारली होती.

शेरशाह
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शेरशाह चित्रपट कारगिल युद्धाचे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित होता.


हेही वाचा :‘टकाटक २’चं धम्माल टायटल साँग प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -