Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ''या बाईनं माझं आयुष्य बदललं''- अपूर्वा नेमळेकर

”या बाईनं माझं आयुष्य बदललं”- अपूर्वा नेमळेकर

मालिकेतील शेवंतानेही तिच्या दिलखुलास अदांनी प्रेक्षकांची मने घायाळ केली. नुकतीच शेवंताने म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली आहे.

Related Story

- Advertisement -

रात्रीस खेळ चाले या मालिकेने अगदी पहिल्या पर्वापासूनच अल्पवधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राला रसिकप्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. जसजसे नवीन पर्व येत गेले तशी या मालिकेविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत गेली. मालिकेचे नवीन सीजन आल्यानंतर अगदी अण्णा नाईकांपासून ते सुषल्यापर्यंत प्रत्येक पात्राची चर्चा पाहायला मिळत आहे. मालिकेतील शेवंतानेही तिच्या दिलखुलास अदांनी प्रेक्षकांची मने घायाळ केली. नुकतीच शेवंताने म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पो्स्टमध्ये तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या मागे भींतीवर शेवंताच्या काही पेंटिंग्स लावलेल्या दिसतायेत. या फोटोखाली अपूर्वाने एक सुंदर असे कॅप्शनही दिले आहे. या बाईनं माझं आयुष्य बदललं.. असे ती म्हणाली आहे.

 

- Advertisement -

यामागील कारण म्हणजे अपूर्वानने जेव्हा स्मॉल स्क्रिनवर शेवंता म्हणून एन्ट्री घेतली तेव्हा पासूनच तिच्या दमदार अभिनयाचं आणि लूके प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक झाले. रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा सीजन येतोय असे कळताच लाडकी शेवंताही या पर्वात दिसणार का या चर्चांना उधान आले.


हे वाचा- फरहान अख्तरची हॉलिवूडमध्ये एंट्री!

- Advertisement -