घरमनोरंजनचित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज सिनेनिर्माते येणार एकत्र

चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज सिनेनिर्माते येणार एकत्र

Subscribe

‘द काश्मीर फाइल्स’ आणि’ द ताश्कंद फाइल्स’ अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आपल्या निर्भय आणि व्हिजनरी शैलीने चित्रपट निर्माण करून सर्वांना थक्क केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. तसेच, त्यांच्या कामगिरीमुळे प्रेक्षकांकडून त्यांना प्रशंसा मिळत असून, दर्शक त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच, त्यांनी ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्याशी हातमिळवणी करून त्यांच्या आगामी मोठ्या सहकार्याचे संकेत दिले आहेत.

अलीकडेच विवेक रंजन अग्निहोत्रीने त्यांच्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्यासोबत एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “सिनेमासह भारताला एकत्र करणे.डिटेल्स लवकरच. गेस? सुकुमार (दिग्दर्शक, #पुष्पा) + अभिषेक अग्रवाल (निर्माता, #TheKashmirFiles) + योर्स ट्रूली (#TheKashmirFiles)”

- Advertisement -

तिन्ही लोकप्रिय सिनेनिर्माते एका प्रकल्पासाठी एकत्र आले आहेत हि संपूर्ण देशासाठी नक्कीच विशेष बाब आहे. जिथे विवेक रंजन अग्निहोत्री ‘द ताश्कंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखले जातात, तिथेच निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कार्तिकेय 2’ सारखे चित्रपट दिले आहेत. तसेच, सुकुमारने त्यांच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’सह देशभर प्रेक्षकांची मने जिंकलीआहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री रिद्धी डोगरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -