घरमनोरंजन'या' दिवशी प्रदर्शित होणार 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर, नवीन पोस्टरसह निर्मात्यांनी...

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर, नवीन पोस्टरसह निर्मात्यांनी केली घोषणा

Subscribe

लव रंजनच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ने केवळ आपल्या अनोख्या टायटलमुळेच नव्हे तर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या धमाकेदार केमिस्ट्रीमुळेही प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढवली आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला, ज्याला पाहून या रोम-कॉम चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच, दर्शक प्रतीक्षा करत असतानाच, निर्मात्यांनी आज एका आकर्षक आणि कव्हर-फुल पोस्टरसह, चित्रपटाचा ट्रेलर 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे.

चित्रपटाचा नवीन पोस्टर रंगीत, मजेदार, आणि आकर्षक आहे. तसेच, हा चित्रपट लव रंजनचा आहे हे लक्षात घेता, चित्रपटाची कथा उत्तम असेल असा अंदाज लावला जात आहे. प्रेक्षकांनी ब्लू यूथ चित्रपटासाठी प्रतीक्षा केली असतानाच ‘तू झूठी मैं मक्कार’या सिनेमात एक असे जग पाहायला मिळेल ज्याच्याशी आजचे तरुण नक्कीच रिलेट करतील. अशातच, आता या चित्रपटाचा ट्रेलर 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, रणबीर आणि श्रद्धा लवकरच दर्शकांच्या भेटीला येतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

- Advertisement -

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.


हेही वाचा :

कुटुंबाप्रति असलेल्या जबाबदाऱ्या…; राजकारणातील प्रवेशावर अवधूत गुप्तेचा शिक्कामोर्तब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -