Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडली, हिंदुजा रुग्णालयात केले दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडली, हिंदुजा रुग्णालयात केले दाखल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज सकाळी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना आता रुग्णालयात दाखल आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वी मागच्या महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा त्यांना रूटीन चेकअपसाठी दाखल केले होते. दरम्यान त्यांची तपासणी झाल्यानंतर लगेच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

पत्नी सायरा बानो दिलीप कुमार यांची खूप काळजी घेत असतात. दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांची पत्नी त्यांच्या आरोग्यासंबंधित माहिती देत असतात. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘सर्व लोकांनी सुरक्षित राहा.’

- Advertisement -

११ डिसेंबर १९२२मध्ये दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचे पहिले नाव यूसुफ खान होते. त्यानंतर पडद्यावर त्यांना दिलीप कुमार नावाने ओळखू लागले. दिलीप कुमार यांनी आपले नाव एका निर्मात्याच्या म्हणण्यानुसार बदलले होते. ज्यानंतर त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. दिलीप कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

- Advertisement -